D. Y. Patil Sakhar karkhana : कोल्हापूर जिल्ह्यातील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखान्याच्या 20 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. कारखान्यकडून चालू हंगामात पहिली उचल प्रतिटन ३ हजार रुपये दिली जाणार आहे.  माजी सहकारमंत्री आणि सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत गळीत शुभारंभ पार पडला. 


बाळासाहेब पाटील, आ. सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक, मनिष दळवी, डॉ. संजय डी. पाटील, गोकुळ अध्यक्ष विश्वास पाटील व इतर मान्यवरांच्या हस्‍ते गव्‍हाणीत ऊसाची मोळी टाकून 20 व्‍या गळीत हंगामाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी बाळासाहेब पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, निर्यात साखर विक्रीची कोटा पध्दत रद्द करुन खुल्या पध्दतीने साखर निर्यातीस परवानगी मिळावी, साखरेचा ‍किमान हमीभाव 35 रुपये करावा. साखरेचे उत्पादन कमी करुन इथेनॉल निर्मितीकडे वळावे. 



आमदार सतेज पाटील म्हणाले, कारखान्याने एफआरपीपेक्षा जादा दर देण्याची भूमिका कायम ठेवली. चालू हंगामात पहिली उचल प्रतिटन ३ हजार रुपये असेल. राज्य सरकारने गोपीनाथ मुंडे ऊसतोडणी वाहतूक महामंडळास कारखान्याकडून वर्गणी घेण्याचे धोरण ठरवलं आहे. मात्र, ऊसतोडणी वाहतूक यंत्रणेकडून होणाऱ्या फसवणुकीबाबत महामंडळाकडून उपाययोजना व्‍हावी. 


या कार्यक्रमास मा. खा. श्री. संजय मंडलिक, डॉ. संजय पाटील, सिंधुदुर्ग बँकेचे चेअरमन मा. मनिष दळवी, मा विश्वास पाटील, मा. बाबासाहेब चौगले यांच्यासह चेतन नरके, कर्णसिंह गायकवाड, विजयसिंह मोरे, स्मिता गवळी, प्रकाश बोडस, समीर सावंत, प्रज्ञा ढवण, नीता राणे, आत्माराम ओरवणेकर, रवींद्र मडगावकर, जयेंद्र रावराणे, बाप्पा मांजरेकर, बजरंग पाटील (तात्या), भगवान पाटील, बयाजी शेळके, सयाजीराव पाटणकर, बंडाआप्पा पडवळ, विलास पाटील आदी मान्यवर व सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, ऊस वाहतूक कंत्राटदार, व्यापारी, कर्मचारी व हितचिंतक उपस्थित होते.


इतर महत्त्वाच्या बातम्या