Gokul Shirgaon MIDC Fire : कोल्हापूर शहराला लागून असलेल्या गोकुळ शिरगाव एमआयडीसीमधील Ceraflux कंपनीच्या Thermochem युनिट दोनमध्ये भीषण आग लागली. या कंपनीचे संपूर्ण युनिट आगीच्या भक्षस्थानी पडले. आज दुपारी तीनच्या सुमारास लागलेल्या आगीवर तब्बल दोन तासांनी यश आले. हा या घटनेत कोणतीही जिवितहानी झालेली नाही. कोल्हापूर महानगरपालिका, कागल नगरपालिका,कोल्हापूर विमानतळ, शाहू साखर कारखाना, कागल एमआयडीसीच्या अग्निशमन जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग नियंत्रणात आणली.
ही आग सर्वप्रथम कंपनीच्या सेराफ्लक्स युनिटमध्ये लागली, त्यानंतर काही वेळातच संपूर्ण कंपनीला आग लागली.संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले होते. यात कोणीही मृत्यूमुखी किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही. या आगीत कंपनीच्या युनिट पूर्णत: जळून खाक झाले आहे. युनिटमध्ये आगीने रौद्ररुप धारण केल्यानंतर धुराचे लोट राष्ट्रीय महामार्गावरून दिसत होते. आग लागल्याचे समजताच कर्मचारी पहिल्यांदा बाहेर पडले. आपत्कालिन मदतीसाठी रुग्णवााहिका तैनात करण्यात आल्या होत्या.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या दहा मिनिटांत घटनास्थळी पोहोचल्या. आगीची माहिती मिळताच कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. त्यामुळे कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नसून लाखोंची मालमत्ता जळून खाक झाली आहे. अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. कंपनीमध्ये असणाऱ्या सिलेंडरच्या स्फोटांमुळे आग नियंत्रणात शर्थीचे प्रयत्न करावे लागले. या आगीत कंपनीचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. आगीची भीषणात लक्षात घेऊन पोलिसांकडूनही मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आग लागल्यानंतर जवळपास 200 मीटर दूरच बघ्यांची गर्दी रोखण्यात आली होती.
कोल्हापूरच्या गोकुळ शिरगावच्या एमआयडीसीमध्ये अनेक कंपन्या आहेत. आगीची भीषणता पाहून ती आसपासच्या कंपन्यांमध्ये तर पसरणार नाही ना, याची भीती वाटू लागली होती. मात्र, आगीवर नियंत्रण मिळवता आल्याने मोठा अनर्थ टळला.
इतर महत्वाच्या बातम्या