Ravi Kumar S : इन्फोसिसचे माजी अध्यक्ष रविकुमार एस. (Ravi Kumar S) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. रवीकुमार एस. यांची कॉग्निझंट (Cognizant) कंपनीने मुख्य कार्यकारी अधिकारीपदी तसेच बोर्ड मेंबर म्हणून नियुक्ती केली आहे. रविकुमार यांना 'कॉग्निझंट'ने दिलेल्या पॅकेजची चांगलीच चर्चा रंगली आहे. रविकुमार एस. यांचे शिक्षण कोल्हापुरात झाले असून ते शिवाजी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यामुळे शिवाजी विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.


चकित करणारा रवीकुमार यांचा जीवनप्रवास


'कॉग्निझंट'च्या सीईओपदी नेमणूक झालेल्या रविकुमार यांचा जीवन प्रवास अत्यंत अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणादायी राहिल, अशा पद्धतीचा आहे. त्यांनी 1987 ते 1991 या कालावधी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाशी संलग्न असलेल्या वारणानगरच्या तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीची केमिकल इंजिनिअरिंग पदवी प्राप्त केली. 1996 मध्ये झेवियर्स इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीएची पदव्युत्तर पदवी घेतली. 1991 ते 1994 या काळात बीएआरसीमध्ये त्यांनी क वर्ग सायंटिस्ट म्हणून काम केले. प्राईज वॉटरहाऊस कूपर्स कंपनीत सीनियर कन्सल्टंट, केंब्रिज टेक्नॉलॉजी पार्टनर्स येथे असोसिएट डायरेक्टर आणि सीआरएम लाईन मॅनेजर, इन्फोसिसचे अध्यक्ष अशा महत्त्वाच्या पदांवर त्यांनी जबाबदारी पार पडली आहे. 


मुकेश अंबानींच्या चारपट अधिक पगार 


रविकुमार इन्फोसिसमधून तडकाफडकी राजीनामा दिल्यापासून चर्चेत आहेत. कारण जागतिक स्तरावरील आयटी कंपनी कॉग्निझंटने त्यांना सीईओ आणि बोर्ड मेंबर केल्यानेच नव्हे, तर त्यांचा अकल्पनीय पगार. रवी कुमार यांचा पगार देशातील उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यापेक्षा चौपट आहे. याआधी रवी कुमार हे इन्फोसिसचे अध्यक्ष होते. 20 वर्षे इन्फोसिसची जबाबदारी सांभाळल्यानंतर त्यांनी आता कॉग्निझंटची जबाबदारी स्वीकारली आहे.


ब्रायन हम्फ्रेज यांच्या जागी रविकुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ब्रायन हम्फ्रेज 15 मार्चपर्यंत कंपनीचे विशेष सल्लागार म्हणून काम करत राहतील आणि यादरम्यान रविकुमार त्यांची जबाबदारी सांभाळतील. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, कॉग्निझंटने रविकुमार यांना भरघोस पगारावर नियुक्त केले आहे. एवढा पगार यापूर्वी कोणत्याही सीईओला देण्यात आलेला नाही. हा पगार देखील माजी सीईओ ब्रायन हम्फ्रेज यांच्या पगारापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. कंपनीने रविकुमार यांना 7 मिलियन डॉलर्स पगारावर आणले आहे. 


इतकेच नाही तर रविकुमार यांना साइन इन बोनस म्हणून 7.5 लाख डॉलर देखील मिळतील. पगाराच्या ब्रेकअपबद्दल बोलायचं झाल्यास रवी कुमार यांचा मूळ पगार 1 मिलियन म्हणजेच 10 लाख डॉलर आहे. याशिवाय कंपनी त्यांना 2 मिलियन डॉलर्सचे रोख प्रोत्साहन (इन्सेंटिव्ह) देत आहे. यासोबतच त्यांना वन टाइम न्यू हायर अवॉर्ड म्हणून 5 मिलियन डॉलर दिले जातील. यासोबतच त्यांना पीएसयू म्हणून 30 लाख डॉलर्स देण्यात येणार आहेत. याशिवाय साडेसात दशलक्ष डॉलर्सचा बोनस स्वतंत्रपणे दिला जाणार आहे.


ब्रँड मजबूत करण्यासोबतच व्यवसाय वाढवण्याची जबाबदारी


रविकुमार यांच्या आधी, ब्रायन हम्फ्रेज कंपनीचे सीईओ पदावर होते. विशेष म्हणजे रविकुमार यांचा पगार मुकेश अंबानींपेक्षा जास्त आहे. 2015 मध्ये मुकेश अंबानींचा पगार 15 कोटी रुपये होता. एवढ्या मोठ्या पगारासोबतच कॉग्निझंटने रविकुमार यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे. ब्रँड मजबूत करण्यासोबतच व्यवसाय अनेक पटींनी वाढवण्याची जबाबदारीही त्यांच्यावर आहे. रविकुमार यांचा इन्फोसिसमधील कार्यकाळ बऱ्यापैकी यशस्वी होता. त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीचा व्यवसाय अनेक पटींनी वाढला. कदाचित त्याचा ट्रॅक रेकॉर्ड लक्षात घेता रविकुमार यांच्यावर इतकी मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या