Chhagan Bhujbal on NDA In Maharashtra : महाराष्ट्रात एनडीएला (The NDA in Maharashtra) 2014 आणि 2019 मध्ये निवडणूक जितकी सोपी गेली तितकी सोपी नसेल. त्यांनी 48 पैकी 41 लोकसभेच्या जागा जिंकल्या होत्या. मात्र, आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवारांच्या (Sharad Pawar) बाजूने सहानुभूतीची लाट असल्याचे अजित पवार गटाचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. भुजबळ यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये 400 पारचा नाऱ्याने सुद्धा अडचण झाल्याचे म्हटले आहे.


'अब की बार 400 पार' घोषणेचा परिणाम झाला आहे का? 


शनिवारी एनडीटीव्हीला दिलेल्या विशेष मुलाखतीत भुजबळ यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून माघार घेण्याच्या त्यांच्या निर्णयावरही खुलासा केला. त्यांनी एनडीएचा 400 जागा जिंकण्याचा नाऱ्यावरही भाष्य केले. 'अब की बार 400 पार' घोषणेमुळे घटनेमध्ये बदल केला जाणार असल्याचा मत मतदारांमध्ये झाल्याचेही भुजबळ यांनी म्हटले आहे. 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी समर्थक आमदारांसह बंड केले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कोसळले होते. यानंतर एक वर्षानंतर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असाच प्रकार घडला. अजित पवार यांनी पक्ष फोडला आणि भाजपशी हातमिळवणी केली आणि उपमुख्यमंत्री झाले. त्यामुळे दोन पक्ष दोन वर्षात फुटले आहेत. 


उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी सहानुभूतीची लाट


अजित पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करण्यात आघाडीवर असलेल्या भुजबळांना लोकसभा निवडणुकीत याचा काय परिणाम होईल? असा प्रश्न विचारला असता ते हिंदीत म्हणाले की, "मला विश्वास आहे की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी सहानुभूतीची लाट आहे. शरद पवार यांनाही सहानुभूती आहे, त्यामुळे मागील दोन निवडणुकीत ज्यापद्धतीने त्यांनी कामगिरी केली त्यापद्धतीने कामगिरी करण्यात मागे पडतील, असे वाटत नसल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यावेळी दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने अविभाजित शिवसेनेसोबत युती करून लढले होते आणि पक्षांनी अनुक्रमे 23 आणि 18 मतदारसंघात विजय मिळवला होता. "लोकांचा विश्वास अजूनही नरेंद्र मोदींवर आहे आणि त्यांनी एक मजबूत सरकार बनवावे अशी त्यांची इच्छा असल्याचेही भुजबळ म्हणाले. 


शरद पवार यांच्या बारामतीच्या बालेकिल्ल्यावर त्यांची मुलगी सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा यांच्यातील लढतीबद्दल विचारले असता महाराष्ट्राचे मंत्री थोडेसे भावूक झाले. "माझ्यासाठीही हे दुःखदायक आहे की, जे लोक एकाच घरात इतकी वर्षे एकत्र राहत आहेत. जे काही घडत आहे ते अनेकांना आवडत नाही. यात दोष कोणाचा, हा वेगळा मुद्दा आहे. पण हे घडले नसते तर खूप चांगले झाले असते,” असेही ते म्हणाले. 


घोषणाबाजीने एनडीएला धक्का?


काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही एनडीएला संविधानात दुरुस्ती करायची आहे म्हणून एनडीए 400 जागा मागत असल्याचे म्हटले आहे. "अब की बार 400 पार" या घोषणेनं एनडीए आघाडीला धक्का बसला आहे का? यावर भुजबळ म्हणाले की, "यावर विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे आणि कर्नाटकातील भाजप खासदार (अनंतकुमार हेगडे) यांनीही असे म्हटले आहे. "पंतप्रधान मोदींनी मात्र संविधान मजबूत आहे आणि ते स्वतः बी.आर. आंबेडकरांनीही बदलता येणार नाही, असे अनेकवेळा सांगितले आहे. पण हा संदेश जनतेला दिला जात आहे. मतपेट्या उघडल्यावरच परिणाम दिसून येईल, असेही ते म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या