Kolhapur News : जीवनात भावनेपेक्षा कर्तव्याला महत्व असते आणि ते कर्तव्य देशसेवा करण्याचं असेल, तर सर्वस्वाचा त्याग करावा लागतो. सीमा सुरक्षा दलात (BSF) जवान असलेल्या कोल्हापूर (Kolhapur News) जिल्ह्यातील करवीर तालुक्यामधील नंदगाव येथील वर्षाराणी पाटील (BSF Jawan Varshrarani Patil kolhapur viral video) यांना  देशसेवा करण्यासाठी जाताना पोटच्या 10 महिन्याचा बाळाला रेल्वे स्टेशनवरून चांगलीच घालमेल झाली. निरोप देताना व्हिडिओ व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या  व्हायरल व्हिडिओतून एकाच स्त्रीमधील मार्तृत्व आणि कर्तव्याची जबाबदारी दाखवणारी दोन रुपे एकाचवेळी दिसून येतात. 


निरोप देताना प्रचंड घालमेल


वर्षाराणी पाटील या सीमा सुरक्षा दलात जवान म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे रजा संपल्यानंतर त्यांना क्रमप्राप्त होते. त्यामुळे पोटच्या अवघ्या 10 महिन्यांच्या बाळाला मागे ठेवून कर्तव्यावर जाण्याशिवाय गत्यंतर नव्हते. त्यामुळे वर्षाराणी पाटील यांना रेल्वे स्टेशनवर जाताना निरोप देण्यासाठी त्यांचे पती, आई वडिल आणि 10 महिन्यांचे चिमुरडे लेकरू आले होते. त्यामुळे रेल्वे सुटण्याची वेळ जशी जवळ येत गेली तशी वर्षाराणी यांची घालमेल वाढत चालल्याचे दिसून येते. 



व्हायरल व्हिडिओमध्ये आपल्या लेकीला निरोप देताना, आई वडिलांची गळाभेट घेताना आणि लहान लेकराला पतीकडे सोपवून पत्नी देशसेवेसाठी जाताना पतीलाही अश्रू अनावर झाल्याचे दिसून येते. मात्र, भावनेला आवर घालून ते पत्नीला समजावताना दिसून येतात. मात्र, लेकराला सोडून जाण्याची कोणतीही मानसिकता बीएसएफ वर्दीतील जवान वर्षाराणी पाटील यांची नसल्याचे दिसून येते. पण म्हणतात ना कर्तव्यासमोर भावनेचं काही चालत नाही याचाच प्रत्यय व्हिडिओतून दिसून येतो. वर्दीमधील वर्षाराणी आई वडिलांसह पतीची गळाभेट पाहताना भावनावश झाल्याचे पाहून भरून आल्याशिवाय राहत नाही. 


वर्षाराणी यांचे पती त्यांचे अश्रू पुसत त्यांना समजावून सांगतानाही झालेली घालमेल दूर होत नाही. त्यामुळे कर्तव्याकडे माय-लेकराची ताटातुट ही काळीज पिळवटून टाकणारी आहे, शिवाय त्यांची मातेच्या कर्तव्यनिष्ठाही दिसून येते. अवघ्या दोन अडीच मिनिटांचा प्रसंग हा सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला असून प्रत्येक ग्रुपमध्ये आणि स्टेट्सला दिसून येत आहे. व्हिडिओ पाहून सोशल मीडियात प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. काहींनी हा व्हिडिओ पाहून अश्रु अनावर झाल्याचेही म्हटले आहे. काहींनी या मातेला सलाम अशी प्रतिक्रिया दिली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या