Kolhapur District Gram Panchayat Election : कोल्हापूर जिल्ह्यात किरकोळ अपवाद वगळता कोल्हापूर जिल्ह्यातील 430 ग्रामपंचायतींसाठी सकाळपासून ईर्ष्येने मतदान सुरु आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक चुरस असलेल्या करवीर तालुक्यात दुपारपर्यंत सरासरी 51 टक्के मतदान झाले. अनेक मतदान केंद्रांवर त्यामुळे मोठ्या रांगा दिसून आल्या. दरम्यान, करवीर तालुक्यातील नेर्ली येथे मतदान यंत्रात बिघाड झाल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला. त्यामुळे मतदानासाठी आलेल्या मतदारांच्या मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले. तब्बल तासभर मशीन बंद पडल्याने मतदार ताटकळले. 


जिल्ह्यातील निवडणूक होत असलेल्या 430 ग्रामपंचायतींपैकी करवीर तालुक्यातील 53 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. कोल्हापूर शहराच्या वेशीवरील गावांचाही त्यामध्ये समावेश आहे. कळंबा, पाचगाव, मोरेवाडी, गांधीनगर, वळीवडे, वडणगे, उचगाव,आदी गावांमध्ये मतदान चुरशीने होत आहे.  


दरम्यान, करवीर तालुक्यातील निवडणूका होत असलेल्या ग्रामपंचायती करवीर आणि कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील आहेत. या ग्रामपंचायतींचे कारभार ठरवण्यासाठी (Karvir Taluka Gram Panchayat) आमदार सतेज पाटील, महाडिक आणि नरके गटात चुरस आहे. त्यामुळे या निवडणुकीतून विधानसभेची जुळणी करण्यासाठी नेत्यांनी पायाला भिंगरी लावली आहे.  करवीर, कागल, हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यात एकही ग्रामपंचायत बिनविरोध झालेली नाही. विधानसभेतील गणित या गावांमधील गटाची सत्ता निश्चित करणार आहे.


एक नजर कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमावर 



  • एकूण ग्रामपंचायती 474

  • बिनविरोध ग्रामपंचायती 44

  • प्रत्यक्ष मतदान ग्रामपंचायती 430

  • बिनविरोध सरपंच उमेदवार 60

  • बिनविरोध सदस्य उमेदवार 847

  • सरपंच रिंगणात उमेदवार 1,193

  • सदस्य पद रिंगणात उमेदवार 8,995

  • एकूण मतदान केंद्रे 2015

  • मतदान कर्मचारी 11075

  • पोलिस कर्मचारी 3000


इतर महत्वाच्या बातम्या