Kolhapur District Gram Panchayat Election : कोल्हापूर जिल्ह्यातील 430 ग्रामपंयतींसाठी मतदान सुरु असतानाच शाहूवाडी तालुक्यात मात्र, पूर्णत: सन्नाटा आहे. ग्रामस्थांनी शाहूवाडीला नगरपंचायतीचा दर्जा देण्यासाठी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे शाहूवाडीतील मतदान केंद्रे मतदारांअभावी ओस पडली आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून शाहूवाडी ग्रामस्थांचा विविध माध्यमातून शाहूवाडी नगरपंचायत करावी या मागणीसाठी लक्ष वेधले आहे. त्यामुळे ग्रामस्थांकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानतंर मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे जिल्ह्यात एकीकडे चुरशीना मतदान होत असताना शाहूवाडी मात्र शुकशुकाट आहे.


राज्य सरकारकडून तालुका ठिकाणच्या गावांना नगरपंचायत देण्याचा निर्णय आठ वर्षांपूर्वी घेतला होता. त्या निर्णयाने शाहूवाडी गावाला नगरपंचायत मंजूर असूनही कार्यवाही झालेली नाही. मात्र, ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाल्याने ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. (Kolhapur District Gram Panchayat Election)


शाहूवाडी नक्की नगरपंचायत होईल 


शाहूवाडी ग्रामस्थांनी घेतलेल्या भूमिकेनंतर खासदार धैर्यशील माने (dhairyasheel mane on shahuwadi) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, शाहूवाडीला नगरपंचायत दर्जा देण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून मागणी होत आहे. वारंवार सांगूनही हा निर्णय झालेला नाही तालुक्याचे गाव नगरपंचायत व्हावे, अशी मागणी आहे. यापूर्वी अशा पद्धतीने अनेक गावांना दर्जा वाढवून देण्यात आला आहे. मात्र, शाहूवाडीचा (dhairyasheel mane on shahuwadi) निर्णय झालेला नाही. लोकशाही पद्धतीने मतदानापासून बाजूला घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. ती रास्त भावना आहे. आपण यासाठी पाठपुरावा करत असून यश नक्की येईल. शाहूवाडीला नक्की नगरपंचायत होईल, आचारसंहितेमुळे राज्य सरकारला निर्णय घेण्यास अडचण येत आहे. त्यामुळे वाच्यता करणार नाही, पण येणाऱ्या काळात शाहूवाडीकरांच्या मनासारखा निर्णय झालेला असेल. 


दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur District Gram Panchayat Election) यापूर्वी 60 गावांमधील सरपंच व विविध गावातील 847 सदस्य बिनविरोध विजयी झाले आहेत. ज्या गावात निवडणूक लागली त्या गावातील जाहीर प्रचाराची शक्तिप्रदर्शनाने झाली होती. सरपंच पदासाठी 414 जागांसाठी 1193 उमेदवार तर सदस्यपदाच्या 4 हजार 402 जागांसाठी  रिंगणात असलेल्या 8995 उमेदवारांचे भवितव्य आज मशीन बंद होईल.निवडणुकीसाठी 2015 केंद्रे आहेत. दहा हजारांवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना यापूर्वीच प्रशिक्षण देण्यात आले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या