कोल्हापूर : आमच्यावर दबाव होता तो काम करण्यासाठी होता, आमदारांना निधी देण्यासाठी दबाव होता, राज्याच्या कामासाठी दबाव होता. मी कुणाच्या दबावाला भीक घालत नाही, आम्ही देखील मराठ्याची औलाद आहे भाषण करून काम होत नाही त्यासाठी ठोस भूमिका घ्यावी लागते, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापुरात उत्तर सभेत केले. यशवंतराव चव्हाण साहेब यांनी सत्तेची गरज सांगितली त्याच मार्गाने मी गेलो, असे पवार यावेळी म्हणाले. 


राज्याचा विकास कसा होईल त्यासाठी आम्ही कायम प्रयत्न करत आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत गेला नाही, लोकांच्या कामासाठी आमच्यावर दबाव होता. काम करणाऱ्या माणसाला हातावर हात ठेवून घरात बसता येत नाही. आमच्याबद्दल चुकीचा मेसेज पसरवला जात आहे. उद्धव ठाकरे यांचे सरकार पडत होते त्यावेळी सत्तेत सहभागी होण्याबाबत 52 आमदारांच्या सहीच पत्र दिलं होतं. हे जर खर नसेल तर मी राजकारणातून निवृत्त होईल. खर असेल तर तुम्ही राजकारणातून बाजूला व्हाल का? अशी विचारणा त्यांनी केली. 


अजित पवार पुढे म्हणाले की, कोल्हापुरात होणारी उत्तरदायित्व सभा माझ्यासाठी महत्वाची आहे. कोल्हापूर हे पुरोगामी चळवळीचे केंद्र कायम राहिलं आहे, बळीराजावरचं दुष्काळाचं सावट दूर करावं हे अंबाबाई चरणी प्रार्थना करतो. महाराष्ट्रातील अनेक भागात अजून म्हणावा तसा पाऊस नाही. कोल्हापूरतील सलोखा कुणी बिघडवत असेल तर सत्तेत असताना देखील आम्ही त्याला विरोध करु. 


मराठा आरक्षणावर अजित पवार म्हणतात... 


जो गरीब आहे त्याला आरक्षण मिळालं पाहिजे. उपोषणाला बसले आहेत त्यांना आम्ही समजावून सांगत आहोत पण ते ऐकत नाहीत. काही ओबीसी देखील आमच्यावर अन्याय नको असे म्हणत आहेत. उद्या (11 सप्टेंबर) सह्याद्रीवर सर्व पक्षांच्या प्रमुखांची बैठक बोलवली आहे.   


कोल्हापूरच्या प्रश्नांवर बोलताताना अजित पवार म्हणाले...


डीपीडीसीचा निधी कोल्हापुरातील तालमींना देता आला पाहिजे यासाठी जी आर काढणार आहे. काळम्मावाडी धरणाची गळती काढण्यासाठी 80 कोटी देणार आहोत. आम्ही सत्तेत आलोय ती अशी कामं करण्यासाठी आलो आहे, पण राज्यात आमची बदनामी केली जात आहे. राज्याची तिजोरी आज माझ्या ताब्यात आहे म्हणून काम करणार म्हणून बोलतो. कोल्हापूर शहराजवळची गावं तातडीने शहरात घेतली पाहिजेत. माझी सर्व पक्षाच्या नेत्यांना विनंती आहे हद्दवाढ करा. माझ्या पुणे जिल्ह्यात किती वेळा हद्दवाढ झालीय ते पहा. मी जे बोलतो ते करतो. कामं घेऊन सातत्याने आला तरी आम्ही राग व्यक्त करणार नाही. ॉ


जी 20 मुळे जगात आपल्या देशाचे नाव उंचावलं


यावेळी बोलताना अजित पवार यांनी आताच्या केंद्र सरकारने साखर कारखान्यांचा टॅक्स माफ केल्याचे सांगितले. याआधी कुणीही टॅक्स माफ केला नाही. असं झालं नसत तर सरकारी साखर कारखाने उद्धवस्त झाले असते. त्याचा परिणाम शेतकऱ्यांना एफआरी देताना होत होता. अडचणीत असलेले साखर कारखाने बाहेर काढले तर काय चुकले? आमदारकी खासदारकीसाठी महिलांना आरक्षण द्यावं अशी आमची मागणी आहे. जी 20 मुळे जगात आपल्या देशाचे नाव उंचावलं.


इतर महत्वाच्या बातम्या