कोल्हापूर : लाडक्या गणरायांच्या स्वागतासाठी अवघी बाजारपेठ सजली आहे. बाजारपेठेमध्ये फळा फुलांपासून ते अगदी लायटिंगच्या माळापर्यंत गणरायांची आरास करण्यासाठी लागणाऱ्या छोट्या मोठ्या वस्तू बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी मोठी झुंबड उडाली आहे. गणरायाच्या स्वागतासाठी गाव पाड्यांपासून शहरे सज्ज झाली आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्ये सुद्धा हे चित्र दिसत आहे. मात्र, कोल्हापूरच्या रस्त्यांवरून प्रवास करत असताना मात्र दुर्दैवविलास आहे. कोल्हापूर शहरातील रस्त्यांची अवस्था पाहता नेमकं कोल्हापुरातून जात आहे की खड्डेपुरातून जात आहे? असाच प्रश्न मनाला पडल्याशिवाय राहत नाही. 


कोल्हापूर शहरातील काही किलोमीटरचे रस्ते सोडल्यास कोल्हापुरातील शहरातील अंतर्गत रस्ते, उपनगरांमधील रस्ते त्याचबरोबर नव्याने वाढलेल्या वसाहतींमध्ये सुद्धा एकही शहराच्या दर्जाचा रस्ता राहिलेला नाही. पाणंदी सुद्धा इतक्या भयंकर नसतात, अशी स्थिती झाली आहे. इतकेच नव्हे तर मोठा गाजावाजा करण्यात आलेल्या 100 कोटींच्या रस्ते प्रकल्पातील रस्ते सुद्धा अवघ्या काही महिन्यांमध्ये उखडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांच्या नशिबी चांगले रस्ते मिळणार तरी कधी? असाच प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर  गणरायांच्या स्वागताला सुद्धा महाकाय खड्ड्यातून जावं लागत असल्याने उपरोधिक प्रतिक्रिया उमटत आहेत. 


कोल्हापुरात नव्हं, खड्डेपुरात सहर्ष स्वागत स्वागत...


कोल्हापूर गेलं खड्ड्यात या हॅशटॅगवर सोशल मीडियामधून कॅम्पेन केलं जात आहे. यामध्ये कोल्हापुरात नव्हं, खड्डेपुरात सहर्ष स्वागत स्वागतोउत्सुक वरन खालपर्यंत प्रशासन आणि सर्वपक्षीय पदाधिकारी असे म्हटले आहे. इतकंच नव्हे, तर मनका मोडून मिळेल असं सुद्धा आणखी एका व्हायरल पोस्टमध्ये म्हटलं आहे. यामध्ये सौजन्य वरन खालपर्यंत प्रशासन आणि सर्वपक्षीय पदाधिकारी असे म्हटले आहे. कोल्हापुरातील रस्त्यांची दुरावस्था इतकी गंभीर आहे की प्रवास करताना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. वाहतूक कोंडी तर नित्य नियमाचा विषय झाला आहे. त्यामुळे सकाळी घरातून बाहेर पडल्यानंतर संध्याकाळी माणूस सुरक्षितपणे घरी परतून येईल की नाही याची कोणती शाश्वती देता येत नाही.


या सर्व कारणांमुळे शहरवासियांच्या प्रकृतीची कारणे तरी वाढली आहत. त्याचबरोबर वाहनांची सुद्धा अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे एक प्रकारे दुर्दैवी कोल्हापूरकरांवर आपलं दुर्दैव म्हणण्याची वेळ आली आहे. शहरातील काही मार्ग असे आहेत की तिथे नेमका रस्ता शोधून सापडणार नाही इतके खड्डे निर्माण झाले आहेत. जेव्हा मुख्यमंत्री, राष्ट्रपती यांचा दौरा असतो त्यावेळी त्या मार्गावर मात्र रस्ते चकचकीत केले जातात. मात्र इतर ठिकाणी परिस्थिती जैसे थे असते.  


इतर महत्वाच्या बातम्या