Rajarshi Shahu Maharaj: कोल्हापूरचे शिल्पकार, आरक्षणाचे जनक, युगप्रवर्तक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतीदिनी अवघी करवीरनगरी 100 सेकंदांसाठी स्तब्ध झाली. लोकराजाचे स्मरण करण्यासाठी स्मृतीस्थळावर मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आज (6 मे) सकाळी 10 वाजता संपूर्ण कोल्हापूर जिल्हा आहे त्या ठिकाणी स्तब्ध झाला. शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या कार्याचा जागर करण्यात आला.  


शाहू स्मृती स्थळावर श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, पालकमंत्री दीपक केसरकर,उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सतेज पाटील, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने यांनी पुष्पहार अर्पण करुन शाहू महाराजांना अभिवादन केले. यावेळी आमदार जयंत आसगावकर, आमदार प्रकाश आवाडे, आमदार पी. एन. पाटील, आमदार राजेश पाटील, आमदार ऋतुराज पाटील, मधुरिमाराजे छत्रपती, यशस्विनीराजे छत्रपती, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, संस्था, संघटनांचे प्रतिनिधी, विद्यार्थी, शाहू प्रेमी नागरिक यांनी 100 सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजा शाहू महाराजांना विनम्र अभिवादन केले. 


सकाळी 10 वाजता रस्त्यांवरील एसटी बसेससह चौकाचौकातील सिग्नलवरील अन्य वाहने, जाग्यावर थांबली होती. विविध शासकीय, निम शासकीय, खासगी कार्यालयांतील अधिकारी, कर्मचारी, व्यापारी, उद्योजक, विक्रेते, बँकांमधील ग्राहक, प्रवासी, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठातील विद्यार्थी, शाहू प्रेमी नागरिकांनी उपक्रमात सहभागी होऊन लोकराजा राजर्षी शाहू महाराजांना मानवंदना दिली.


राजर्षी शाहू महाराज यांच्या राजपोषाखातील 1 हजार प्रतीचे वाटप


शताब्दीपूर्ती अभिवादनानंतर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, दीपक केसरकर, तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार व आमदारांच्या हस्ते शाहू महाराजांच्या राजपोषाखातील रंगीत 1 हजार फोटो प्रतींचे वाटप शुभारंभ केला करण्यात आला. यावेळी स्मृती समितीचे अध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी शाहू स्मृतीशताब्दी वर्षामध्ये 1 लाख पेक्षा जास्त प्रतीचे वाटप करण्यात आल्याचे सांगितले. येत्या काळात 10 प्रती देशभर वितरण करण्याचा संकल्प आहे. समितीच्या वतीने राजर्षी शाहू महाराज शाहू महाराज यांची प्रतिमा घरोघरी लागण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 


राजर्षी शाहू छत्रपती : एक समाजक्रांतिकारी राजा ग्रंथाचे प्रकाशन 


दरम्यान, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार लिखित ‘राजर्षी शाहू छत्रपती : एक समाजक्रांतिकारी राजा’ या चरित्राचा अनुवाद रशियन आणि इटालियन या ग्रंथामध्ये केला आहे. या अनुवादित ग्रंथाचे प्रकाशन वाजी विद्यापीठातील सिनेट सभागृहात ज्येष्ठ साहित्यिक सुरेश द्वादशीवार यांच्या हस्ते करण्यात आले. शिवाजी विद्यापीठात 100 सेकंद स्तब्धता पाळून अभिवादन करण्यात आले.


300 शिबीरार्थींनी वाहिली शाहूराजांना आदरांजली


शिवाजी पेठेतील मर्दानी कलाविशारद आनंदराव पोवार प्राचीन युद्धकला प्रशिक्षण संस्‍थेच्‍यावतीने 300 शिबीरार्थींनी शाहू महाराजांना आदरांजली वाहिली. रंकाळा तलावाच्‍या काठावर 100 सेकंद स्‍तब्ध राहून या शिबीरार्थींनी अनोखी मानवंदना दिली.


इतर महत्वाच्या बातम्या