Nipah Virus Different From Corona Virus : कोरोना व्हायरस अजून जगातून पूर्णपणे गेलेला नसतानाच निपाह व्हायरसने आता जगभरात खळबळ उडवली आहे. केरळमध्ये यात विषाणूने डोके वर काढले आहे. केरळमध्ये अनेक लोक या आजाराचे शिकार झाले आहेत. हा आजार प्राणी आणि पक्ष्यांमुळे पसरणारा आजार आहे. तर कोरोना आणि निपाह या दोन आजारांची तुलना केली तर कोरोनापेक्षा निपाह व्हायरस जास्त भयानक आहे. याचे महत्वाचे कारण असे की, यावर कोणताही इलाज नाही तसेच उपचारासाठी आजपर्यंत कोणतीही लस तयार करण्यात आलेली नाही. निपाह व्हायरस काय आहे, तो कसा पसरतो, त्याचे धोके आणि लक्षणे जाणून घेऊया. 


प्राण्यांच्या मार्फत पसरला जातोय निपाह व्हायरस


निपाह व्हायरस डुक्कर आणि वटवाघळांच्या माध्यमातून पसरणारा विषाणू आहे. हा विषाणू या संक्रमित प्राण्यांच्या संपर्कात आल्यावर मानवी शरीरावर हल्ला करतो. या प्राण्यांनी खालेल्ल्या फळांच्या सेवनाने देखील या विषाणूचा प्रसार होऊ शकतो. ज्या घरातील व्यक्तीला या विषाणूची लागण झाली असेल त्या व्यक्तीमुळे घरातील इतर लोकांना देखील विषाणूची लागण होऊ शकते. ज्या कोणाला या विषाणूची लागण झालेली आहे त्याला श्वसनासंबंधी आजाराला सामोरे जावे लागते. तसेच एन्सेफलायटीस सारखा आजार देखील होऊ शकतो. निपाह व्हायरसचे लक्षणं शरीरात दिसण्याकरता 5 ते 14 दिवस लागतात. तर काही वेळेस विषाणू लागण झालेली असेल तरीही लवकर लक्षणे दिसून येत नाहीत.


काय आहेत निपाह व्हायरसची लक्षणं


निपाह व्हायरसची लक्षणं लवकरात लवकर ओळखले तरच हा आजार बरा होऊ शकतो. कारण यावर कोणतेही औषध किंवा लस नाही. विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीला सुरूवातीस खूप जास्त ताप येतो, डोकं दुखु लागते, घसा खवखवणे, खोकला, जास्त झोप, अशक्त आणि थकल्यासारखे वाटणे आणि स्नायू दुखणे ही लक्षणं दिसू लागतात. मात्र रूग्णाची परिस्थिती गंभीर असेल तर त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागतो आणि मेंदुला सूज येते. यामुळे व्यक्ती कोमातही जाऊ शकतो.


निपाह व्हायरस कोरोना व्हायरसपेक्षा किती वेगळा आहे?


या दोनही विषाणूंची आपण तुलना केली, तर कोरोनाच्या तुलनेत निपाह व्हायरस जास्त पसरत नाही. मात्र या विषाणूमुळे होणाऱ्या मृत्युचा विचार केला तर मृत्युदर देखील कमी आहे. पण कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीला फुफ्फुसामुळे जास्त त्रास होत होता. कारण कोरोनाचा व्हायरस फुफ्फुसाला ईजा होत होती. मात्र कोरोनावर लस आणि औषधे देखील होती. पण निपाहमध्ये लागण झालेल्या व्यक्तीच्या मेंदुला
सूज येते आणि तो कोमात जातो. या आजावर अजून तरी कोणतेही औषध , लस तयार करण्यात आलेली नाही. 


 


इतर महत्वाच्या बातम्या


Health Tips : 'हे' पदार्थ 13 महिन्यांच्या बाळासाठी फारच उपयुक्त; आजपासूनच खायला सुरुवात करा