नाशिक: कवी कुमार विश्वास (Kumar Vishwas) यांच्या नाशिकमधील एका कवी संमेलनाच्या कार्यक्रमात मराठी भाषिकांना प्रवेश नाकारल्याचा आरोप करण्यात आला. हा कार्यक्रम फक्त हिंदी भाषिकांसाठीच असल्याचं उत्तरही देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी हा कार्यक्रम होत आहे त्या कवी कालिदास नाट्यगृहाबाहेर या कार्यक्रमाच्या स्वागताचे भाजप आमदार सीमा हिरे (BJP MLA Seema Hire) आणि नगरसेवकाचे होर्डिंग दिसत आहे. 


जाहिरात केली पण पास कुठे मिळतात हे सांगितलं नाही


कुमार विश्वास यांच्या कार्यक्रम नाशिकमध्ये (Kumar Vishwas Programme Nashik) असल्याचं नाशिकच्या चौकाचौकात लावण्यात आले आहेत. हिंदी दिनानिमित्त हिंदी प्रसारिणी सभा नाशिक द्वारे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाचे पास कुठे उपलब्ध होतील याची माहिती मात्र कुठेही देण्यात आली नाही. या कार्यक्रमाची जाहिरात ही मराठी वृत्तपत्रातही देण्यात आली आहे. मात्र त्या ठिकाणीही याच्या पास वा तिकीटाची माहिती दिलेली नाही.


Kumar Vishwas Programme Nashik : नाट्यगृहाच्या बाहेर गोंधळ 


कुमार विश्वास यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी ज्यावेळी लोक कालिदास नाट्यगृहाच्या ठिकाणी आले त्यावेळी त्यांना यासाठी पासची गरज असल्याचं सांगण्यात आलं. या कार्यक्रमाचे पास फक्त काही लोकांकडेच असल्याचं दिसून आलं. आता हे पास फक्त ठराविक लोकांकडेच कसे आले असा प्रश्न सर्वांना पडला. 


कुमार विश्वास यांचे नाव ऐकून लोक या ठिकाणी लोक आले. पण आयोजकांपैकी एका व्यक्तीने मराठी भाषिकांना तुम्ही इथे कसे आलात हा प्रश्न विचारल्याचं सांगण्यात येतंय. 


पास मिळाला नसल्याने आरोप


कुमार विश्वास यांच्या कार्यक्रमाचा पास मिळाला नसल्याने काहींनी चुकीचे आरोप केले असल्याचा दावा आयोजकांकडून करण्यात आला. जागा कमी आणि लोक जास्त झाल्याने, योग्य नियोजन न झाल्याने हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचं आयोजकांनी स्पष्ट केलं. 


 




कार्यक्रमाच्या बाहेर भाजप आमदारांचे होर्डिंग


विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या स्थळी भाजप आमदार सीमा हिरे आणि भाजपच्या नगरसेवकांचे मोठे होर्डिंग आहेत. त्यावर या कार्यक्रमाला येणाऱ्या प्रेक्षकांचे स्वागत असल्याचा मजकूर दिसतोय. 


 


ही बातमी वाचा: