Nashik Teachers Constituency Election 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) कंबर कसली असून शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे (Kishor Darade) यांच्यासाठी नाशिक, जळगाव, अहमदनगरमध्ये बैठका घेतल्या. मात्र जळगाव येथील मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर शिक्षकांना पैसे वाटप केल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केला. आता यावर शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 


महायुतीचे उमेदवार दराडे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जळगावातील आदित्य लॉन्स येथे सभा झाली. सभेनंतर जिल्ह्यातील आलेले प्रत्येक शाळेचे शिक्षक, कर्मचारी, मुख्याध्यापक, संस्थाचालक यांना पैसे वाटप करण्यात आले. कुठे आहे निवडणूक आयोग?, असा आरोप सुषमा अंधारे यांनी 'एक्स'वर व्हिडिओ शेअर करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.


आरोप करणाऱ्यांची कीव वाटते


सुषमा अंधारे यांच्या आरोपावर किशोर दराडे यांनी म्हटले आहे की, मुळातच मला अशा पद्धतीने आरोप करणाऱ्यांची कीव वाटते, हे शिक्षकांचे मतदान असून त्यांच्याकडे कुठलीही मुद्दे नसल्याने चुकीचे खोटे पद्धतीचे आरोप केले जातात.  


किशोर दराडेंकडून विवेक कोल्हेंचा पप्पू म्हणून उल्लेख 


अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी किशोर दराडे यांच्यावर बोगस शिक्षक भरतीचा आरोप केला होता. यावर किशोर दराडे म्हणाले की, मुळातच त्या पप्पूला काहीही कळत नाही. या मतदानासाठी गेल्या सहा महिन्यांपासून नोंदणी सुरू आहे. दोन वेळा शासनाने अध्यादेश काढून नोंदणी झाल्या आहेत. कोणत्याही बोगस नोंदणी झालेल्या नाहीत. कोपरगावला एकाच दिवसात 670 शिक्षक कसे काय तयार झालेत? असा सवाल त्यांनी विवेक कोल्हेंना विचारला आहे. 


शिक्षक आपले गुलाम होतील वक्तव्यावर किशोर दराडेंचे स्पष्टीकरण


शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या सभेत शिक्षक आपले गुलाम होतील, असे वादग्रस्त वक्तव्य यावर किशोर दराडे यांनी केले होते. यावर त्यांनी म्हटले की, चुकीचा अर्थ काढू नका. आजपर्यंत मुख्यमंत्र्यांनी 1 हजार 160 कोटी रुपये दिले म्हणून शिक्षकांच्या चुली पेटल्या आहेत. मराठी भाषा आहे. त्यामुळे ती कशीही वळते. यामुळे गैरसमज करून घेऊ नये, असे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिले. 


आणखी वाचा