Samantha Akkineni announce Divorce with Naga Chaitanya: नागा चैतन्य  (Naga Chaitanya) आणि सामंथा अक्किनेनी (Samantha Akkineni) गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत. या बातमीनंतर, प्रत्येकाला जाणून घ्यायचंय की असं काय झालं की ह्या दोघांना घटस्फोट घ्यावा लागला. आता स्वतः सामंथाने या बातम्यांवर शिक्कामोर्तब केलं आहे. अलीकडेच, तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करताना, सामंथाने तिच्या घटस्फोटाबद्दल चाहत्यांना माहिती दिली आहे. दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.


Samantha Akkineni Post: सामंथाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक नोट शेअर केली आहे. त्यात लिहलंय की, 'आमच्या सर्व हितचिंतकांसाठी.. खूप विचार केल्यानंतर, चैतन्य आणि मी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही पती-पत्नीसारखे आमचे मार्ग वेगळे करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही खूप भाग्यवान आहोत की आम्ही दहा वर्षांहून अधिक काळ मित्र आहोत जे आमच्या नात्याचा आधार होता. आमच्यात मैत्री कायम राहील.'






Samantha Akkineni Instagram Post: एवढेच नाही तर सामंथाने असेही लिहिले, की 'आम्ही आमच्या चाहत्यांना, हितचिंतकांना आणि माध्यमांना विनंती करतो की तुम्ही सर्वांनी आमच्या या कठीण काळात आम्हाला साथ द्या आणि आमच्या दोघांनाही पुढे जाण्यासाठी प्रायव्हसी द्या. तुमच्या सर्वांच्या समर्थनाबद्दल खूप आभार. '