यावेळी आव्हाड म्हणाले की, 30 जून 2019 रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे चिराग नगर येथे राष्ट्रीय स्मारक उभारावे अशी मागणी केली होती. अण्णाभाऊंनी अजरामर साहित्य लिहिले, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत डफ वाजून महाराष्ट्र पेटवला नवचैतन्य निर्माण केलं. मंत्री होताच भव्य स्मारक उभारण्याचं निर्णय घेतला, असं ते म्हणाले. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं परळ येथील घर आता राष्ट्रीय स्मारक होणार आहे. हे काम सुरु करण्याचा निर्णय आज घेतला, असेही त्यांनी सांगितलं.
ते म्हणाले की, म्हाडाने निर्णय घेतला 45 दिवसाच्या आत फाईल क्लिअर करायची असाच निर्णय एसआरए बाबत होणार आहे. बिल्डरला आजच्या घडीला मदत केली पाहिजे. बिल्डरने बिल्डिंग बांधली तर गरिबांना घर मिळतील. कायद्याने जे अधिकार दिले आहेत त्याचं पालन त्यांनीही केलं पाहिजे. काही लोकांमुळे एसआरए योजना अडकू नये यासाठी प्राधान्य राहील, असेही आव्हाड म्हणाले.
त्यांनी सांगितलं की, म्हाडाकडे जमिनी आहेत काही प्रकल्प आणता येत का, एफडीए आणता येतील का यावर देखील विचार केला जात आहे. मराठी माणूस मुंबईत राहिला पाहिजे. घरांच्या किमती वाढत गेल्या आहेत. म्हाडाचं घर स्वस्तात पडतं. हाऊसिंग स्टॉक वाढवून घर देता आली पाहिजे हा आमचा प्रयत्न राहील, असे ते म्हणाले. माहुलवासियांना जिवंत ठेवण्याची गरज आहे. यासाठी सरकारशी चर्चा करू. मी परत एकदा मुख्यमंत्र्यांना यासाठी बोलणार आहे, असे ते म्हणाले.
संबंधित बातमी
इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची उंची 100 फुटांनी वाढणार
14 एप्रिल 2022 पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम पूर्ण करणार : अजित पवार
बाबासाहेबांनी 22 वर्ष वास्तव्य केलेल्या परेलमधल्या चाळीत अनुयायांचा ओढा
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक अडचणीत, लंडनच्या क्वीन कौन्सिलचा आक्षेप