जालना: संभाजीराजे छत्रपती यांना शोषितांचा कळवळा नाही. मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचे आंदोलन राजकारणासाठीच करण्यात आले होते. मराठवाड्यातल्या बारा बलुतेदारांच्या दुकानावर हल्ले झाले, नाभिक समाजाच्या लोकांच्या दुकानांवरती हल्ले झाले, हे कशात बसते? संभाजी राजे तुम्हाला राजे म्हणायला लाज वाटते. तुम्ही छत्रपती शाहू राजांचे आणि शिवरायांचे देखील वारस नाहीत. मिस्टर संभाजी भोसले,ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही, अशी घणाघाती टीका करत लक्ष्मण हाके यांनी संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांच्यावर पलटवार केला. ते सोमवारी वडीगोद्री येथे प्रसारमाध्यांशी बोलत होते.


छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य निर्माण होण्यासाठी अठरापगड जातींनी जीवाची कुर्बानी दिली. संभाजी भोसले आता मी तुम्हाला राजा म्हणणार नाही. आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचे आम्ही पाईक आहोत. मिस्टर संभाजी भोसले विशाळ गडावरती माझ्या मुस्लिम माता-माऊली लढत होत्या, तेव्हा तुम्ही हात वर करून चिथावणी देत होता. त्या जरांगेंनी त्याच्या बॅनर छत्रपती शाहू महाराजांची प्रतिमा वापरली आहे का? आम्ही एका जातीची मागणी करत नाही, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले.


हाकेंची संभाजीराजेंवर आगपाखड


या पत्रकार परिषदेत लक्ष्मण हाके यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्यावर जोरदार आगपाखड केली. अरे जात चोरतात तुम्ही. त्यासाठी मागासवर्गीय जन्माला यावं लागतं जन्माने मागासवर्गीय असावा लागतो. नाहीतर राज्य मागासवर्ग आयोगाच्या पॅरामीटर्समध्ये यावं  लागते. एका बाजूला 96 कुळी मराठा दुसऱ्या बाजूला मागासवर्गीयांच्या आरक्षण मागायचं. संभाजी भोसले तुम्हाला आम्ही राजे का म्हणायचं? छत्रपती शिवरायांच्या शाहू महाराजांचा वैचारिक वारसा असता तर तुम्ही या आठवडा पगड जातीच्या भटक्यांच्या निमित्तांच्या आंदोलनात भेट दिली असती. राजा हा राजा राणीच्या पोटातून नाही आंबेडकरांच्या संविधानातून जन्माला येतो. इथून पुढे ओबीसीची जनता तुम्हाला राजा म्हणणार नाही, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले. ओबीसी नेते जोपर्यंत दबावत राहतील तेव्हा जरांगे तुमच्या मानगुटीवर बसेल. ओबीसी नेत्यांनो जर तुम्ही या लोकांच्या दबावखाली राहाल तर महाराष्ट्रातून तुमचं अस्तित्व संपवलं जाईल, असेही हाके यांनी म्हटले.



आणखी वाचा


मनोज जरांगेंच्या आंदोलनासमोर दुसरं आंदोलन उभं करणं म्हणजे.... संभाजीराजेंच्या लक्ष्मण हाकेंना कानपिचक्या


अंतरवली सराटीत उपोषणाच्या सातव्या दिवशी मनोज जरांगेंची तब्येत प्रचंड खालावली, उठून बसणंही मुश्कील, संभाजीराजे छत्रपती अंतरवाली सराटीत दाखल