OBC reservation:मराठा आरक्षणासह ओबीसी आरक्षणप्रश्नही आता चांगलाच तापला आहे. जालन्यातील वडीगोद्री येथेही ओबीसी आंदोलक ॲड मंगेश ससाणे यांच्यासह काही सहकाऱ्यांनीही ओबीसी आरक्षणसाठी आंदोलन करण्यास सुरुवात केली होती. उपोषणाच्या पाचव्या दिवशी उपोषणस्थळी ॲब्यूलन्स आल्याचे दिसले. या उपोषणातील सहकारी बाळासाहेब दखने यांची प्रकृती खालावली असून त्यांना उपोषणस्थळावरून हलवण्यात आले आहे.ॲड मंगेश ससाणे आणे बाळासाहेब दखने यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस असून अस्वस्थ वाटल्यानं त्यांना दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.


ओबीसी आरक्षणाला धक्का लाऊ नका अन्यथा गंभीर परिणाम होतील असा इशारा नुकताच मंगेश ससाणे यांनी दिला होता. मराठा ओबीसी आरक्षणातील हैद्राबाद गॅझेटच्या मागणीवरून आता ओबीसी मराठा पुन्हा आमनेसामने आले असून मंगेश ससाणे आणि बाळासाहेब दखने यांच्या उपोषणाच्या पाचव्या दिवशी तब्येत खालावल्यानं उपोषणस्थळी गोंधळ उडाला होता.


बाळासाहेब दखनेंची प्रकृती खालावली


ॲड मंगेश ससाणे यांच्या उपोषणातील सहकारी बाळासाहेब दखने यांची प्रकृती खालावली असून रक्तदाब कमी झाल्याने तसेच हिमोग्लोबीन लो झाल्यानं त्यांना उपोषणस्थळी चक्कर आली. यावेळी त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.


आंदोलनाचा पाचवा दिवस


मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं या मागणीसाठी आंतरवाली सराटीत आंदोलन सुरु केले आहे. ओबीसी नेत्यांचा जरांगेंच्या मागणीला विरोध आहे. त्यासाठी मंगेश ससाणे यांनी आंतरवातील आंदोलन सुरु केले केल्यानंतर नवनाथ वाघमारे यांनी आंतरवालीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांना रोखण्यात पोलिसांना यश आलं. एकीकडे मंगेश ससाणे यांचं उपोषण सुरु असून आता लक्ष्मण हाके सुद्धा आंतरवालीत उपोषण सुरु केलं असून या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे.