जालना: राज्य सरकारला दिलेला अल्टिमेटम संपल्यानंतर आज पुन्हा मनोज जरांगे (Manoj Jarange) आक्रमक होत आंदोलन सुरू केलं. मात्र छत्रपती संभाजीराजेंनी (Sambhajiraje Chhatrapati) मागणी केली आणि मनोज जरांगे आजचा दिवस पाणी प्यायले. छत्रपती संभाजीराजेंचा आदर आणि सन्मान म्हणून केवळ आजच्या दिवसासाठी पाणी घेणार, पण उद्यापासून पुन्हा आंदोलन (Maratha Reservation) सुरू करणार असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. 


जालना : मनोज जरांगे यांनी आजपासून सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज छत्रपती संभाजी राजे यांनी उपोषण स्थळी मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी छत्रपती संभाजीराजे यांनी शिवरायांचे वंशज म्हणून मनोज जरांगे यांना तब्येतीची काळजी घेत पाणी घेऊन उपोषण स्थगित करण्याची  विनंती  केली. यावेळी जरांगे यांनी आजचा दिवस पाणी पिऊन आपण राजेंचा शब्द मोडत नसल्याच सांगिंतलं. आज पाणी ग्रहण केलं मात्र उद्यापासून आपण पाणीही घेणार नसल्याचं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं.


मराठा आरक्षण आंदोलनाचा दुसरा पार्ट सुरू


मराठा समाजाला 40 दिवसांच्या मुदतीत आरक्षण न दिल्याने आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेत. जरांगे पाटलांनी आंतरवाली सराटीत सकाळपासून आंदोलनाला सुरूवात केली. अन्नपाणी, उपचार घेणार नाही आणि सलाईनही लाऊ देणार नाही, असा निर्धार जरांगे यांनी केलाय. त्याचप्रमाणे, मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण मिळेल ही आशा फोल ठरली असं ते म्हणाले. सरकार मराठा समाजाची दिशाभूल करतंय असा आरोप त्यांनी यावेळी केला. दरम्यान, हिंसक आंदोलन, जाळपोळ तसेच आत्महत्या करू नका असं आवाहनही जरांगेंनी केलंय. 


मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा दुसरा पार्ट आजपासून सुरू झालं. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली. दरम्यान राज्य सरकारला दिलेलं ४० दिवसांचं अल्टिमेटम आज संपलंय त्यामुळे प्रत्येक जिल्हा पातळीवर साखळी उपोषण करण्यात येणार आहे. तसंच पुढाऱ्यांनांही गावबंदी करण्यात येणार आहे. 


दरम्यान, धाराशिव जिल्ह्यातल्या 109 गावांमध्ये राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे. पुढाऱ्यांना गावबंदी असल्याचे चौका चौकात फलक लावण्यात आलेले आहेत. 


आरक्षणासाठी जीवाची बाजी लावणार 


आता किती संधी सरकारला द्यायच्या? आरक्षण आमच्या हक्काचे आहे, मी माझ्या जीवाची बाजी लावणार. संवादातून आता प्रश्न सुटणार नाही, आता आरक्षण द्या अशी आक्रमक मागणी मनोज जरांगे यांनी केलीय. आज आंदोलनाचा 41 वा दिवस आहे. मुख्यमंत्री यांचा सन्मान केलाय, मुख्यमंत्री यांच्या शपथेचे कौतुक आहे. पण आम्ही जसा मुख्यमंत्र्यांचा सन्मान केला तसा त्यांनी देखील आरक्षण देऊन सन्मान केला पाहिजे असं जरांगे म्हणाले. 


ही बातमी वाचा: