छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षणासाठी राज्यभरात रान उठवणारे मनोज जरांगे पाटील यांना मंगळवारी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयातून सोडण्यात आले. मनोज जरांगे यांनी 8 जूनपासून मराठ्यांना सगेसोयऱ्यांचे आरक्षण मिळावे, यासाठी अंतरवाली सराटी (Antarwali Sarati) येथे उपोषण सुरु केले होते. सरकारच्या आश्वासनानंतर पाच दिवसांनी त्यांनी आपले आमरण उपोषण स्थगित केले होते. मात्र, दरम्यानच्या काळात मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांचा प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर मंगळवारी दुपारी जरांगे पाटील यांनी रुग्णालयातून सोडण्यात आले.
यानंतर मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीच्या दिशेने रवाना झाले. यावेळी रुग्णालयाबाहेर मराठा आंदोलकांनी मोठी गर्दी केली होती.अंतरवालीकडे जाताना मनोज जरांगे यांच्यासोबत तब्बल दीडशे ते दोनशे गाड्यांचा ताफा आहे. आता रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर मनोज जरांगे पाटील काय करणार, हे पाहावे लागेल. मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला मराठा समाजाला सगेसोयऱ्यांच्या व्याख्येतील आणि ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी 13 जुलैपर्यंतची मुदत दिली आहे. मात्र, लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्त्वाखाली ओबीसी आंदोलन जोर पकड असल्याने आता जरांगे काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल.
मला मराठा नेत्यांचे फोन, आता अंतरवाली सराटीत जाऊन शांतपणे आंदोनल करणार: जरांगे पाटील
रुग्णालयातून निघण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आंदोलकांकडून त्यांचे जुने सहकारी डॉ. रमेश तारक यांना काळे फासण्यात आल्याच्या प्रकरणावर भाष्य केले. रमेश तारक यांच्याबाबत घडलेली घटना पाहून वाईट वाटले. मराठा आंदोलनाला गालबोट लावण्याचं काम चांगलं नाही. मी अशा काड्या करत नाही. डॉ. तारक यांना माहिती आहे, त्यांच्याकडून एकदा चूक झाली असेल ते आम्ही सोडून दिले. समाजाला दुःख होईल असे पाऊल उचलायचे नाही. आता मी अंतरवलीत जाणार, बसणार, शांततेत आंदोलन सुरू करणार आहे. मी एकटा पडल्याचे म्हणालो, त्यानंतर अनेक मला अनेक मराठा नेत्यांची मला कॉल्स आलेत. माझं म्हणणं इतकं होत की, ओबीसी समाजाचे नेते एकत्र आले तर आपणही एकत्र यायला हवे, असे मी त्यांना सांगितले. तसेच लक्ष्मण हाके किंवा धनगर बांधव माझे विरोधक नाहीत. बस मराठ्यांवर डाव टाकू नका, आम्हाला फसवू नका, असे जरांगे पाटील यांनी म्हटले.
आणखी वाचा