अंतरवली सराटी : सरकारच्या शिष्टमंडळाने आज अंतरवली सराटीमध्ये (Antarvali Sarati) जाऊन जरांगे पाटलांचं दुसऱ्या टप्प्यातील उपोषण सोडवलं. दरम्यान या शिष्टमंडळात उदय सामंत, धनंजय मुंडे, बच्चू कडू यांचा समावेश होता. यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी म्हटलं की, येणाऱ्या काळात जरांगे पाटलांच्या लढ्याला यश मिळवून देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी त्यांच्या दुसऱ्या टप्प्यातील उपोषण स्थगित केलं. दरम्यान यावेळी त्यांनी 2 जानेवारी पर्यंत सरकारला मुदत दिली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला शिंदे समितीला दोन महिन्यांचा वेळ दिला आहे. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानत असल्याचे वक्तव्य कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केलं. मनोज जरांगे पाटील यांच्या लढाईला अर्ध यश मिळालं आहे. येणाऱ्या काळात राहिलेलं यश पूर्ण करेल, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं.
आंदोलकांचा दोन महिन्यांची मुदत देण्यास विरोध
अंतरवली सरटीच्या व्यासपीठावर जरांगे पाटलांनी सरकारला दोन महिन्यांचा अवधी दिला. पण यावेळी काही आंदोलकांनी सरकारला इतका वेळ देण्यास विरोध केला. पण यावर जरांगे पाटलांनी आंदोलकांना शांत राहण्यास सांगितलं. त्यांच्याकडून आरक्षण कसं मिळवायचं हे मी पाहतो. त्यांच्या छाताडावर बसून मी आरक्षण घेईल, असं आश्वासन जरांगे पाटलांनी केलं.
2 जानेवारीपर्यंतचा सरकारला वेळ
मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेलं मनोज जरांगे यांचं उपोषण अखेर सुटलं आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर मनोज जरांगे यांनी सरकारला वेळ देण्याची तयारी दर्शवली. तर त्यांनी त्यांचं दुसऱ्या टप्प्यातील उपोषण अखेर मागे घेतलं सरकारच्या शिष्टमंडळाने अंतरवली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली. 2 जानेवारीपर्यंतचा वेळ दिला आहे.
यावेळी सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणार असाल तर सरकारला वेळ देण्यास तयार असल्याचं यावेळी मनोज जरांगे यांनी म्हटलं. तसेच यावेळी महाराष्ट्रातील सगळ्या मराठा बांधवांना आरक्षण मिळायला हवं असं देखील यावेळी मनोज जरांगे यांनी म्हटलं. सरकारच्या शिष्टमंडळासोबत जरांगे पाटलांची यशस्वी चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. आता दिलेला वेळ हा शेवटचा आहे. त्यामुळे वेळ घ्या पण आता आरक्षण द्या, असं मनोज जरांगेंनी यावेळी म्हटलं. तसेच आता पुढच्या लढाईसाठी तयार राहण्याचं आवाहन देखील मनोज जरांगे यांनी केलं. तर जरांगे पाटलांनी 24 डिसेंबरपर्यंतचा वेल सरकारला दिला.
हेही वाचा :
Manoj Jarange : जरांगे पाटलांचं उपोषण मागे, सरकारला दोन महिन्यांची मुदत