जालना (आंतरवाली सराटी) : महाराष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी मी पुन्हा येईल, अशा आशयाचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा (Devendra Fadnavis) व्हिडीओ भाजपकडून ट्वीट करण्यात आला होता. या व्हिडिओमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. त्यामुळे काही तासांत हा व्हिडिओ डिलीट करण्यात आला. दरम्यान, यावरून आता अनेक प्रतिक्रिया येत असून, मनोज जरांगे यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. वैयक्तिक राजकारणावर आम्ही आम्ही टीका करणार नाही. तसेच, यात मी पडणार नाही, असे जरांगे म्हणाले. 

Continues below advertisement

फडणवीसांच्या व्हिडिओवर बोलतांना जरांगे म्हणाले की, "व्हिडिओ टाकला अन् डिलीट पण केला का?, दमही निघाला नाही. यात मी पडणार नाही. माझा स्वभाव सर्वांना माहित आहे. टीका करायची म्हणून करायची असे मी कधीच करत नाही. ते पुन्हा आले किंवा तिथेच राहिले तरीही आमची गोरगरिबांच्या लेकरांना आरक्षण देण्याचीच मागणी असणार आहे. असे केल्यास मराठ्याचे पोरं त्यांना डोक्यावर घेऊन नाचतील. आमच्या विरोधात गेल्यावर आम्ही टीका करत असतो. मग तो कोणीही असो त्याला सुट्टी नाही. वैयक्तिक राजकारणावर आम्ही आम्ही टीका करणार नाही. परंतु, सर्व राजकीय लोकांनी एकत्र येऊन मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवायला पाहिजे,” असे जरांगे म्हणाले.  

आंदोलन आणखी तीव्र होणार? 

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्याकडून आमरण उपोषण करण्यात येत आहे. तर, राज्यभरात साखळी उपोषण करण्यात येत आहे. मात्र, दुसऱ्या टप्प्यात हे आंदोलन आता आणखी तीव्र केले जाणार आहे. उद्यापासून राज्यभरात सुरु असलेले साखळी उपोषणाच्या ठिकाणी आता आमरण उपोषण सुरु करण्याचे आवाहन जरांगे यांनी केले आहे. तसेच, कोणालाही काहीही झाल्यास यासाठी सरकार जबादार राहील असेही जरांगे म्हणाले आहे. 

Continues below advertisement

धनगर आरक्षण उपोषणकर्ते जरांगेंच्या भेटीला...

यशवंत सेना राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतल्ले, चौंडी येथील धनगर आरक्षण उपोषणकर्ते सुरेश बंडगर यांनी आज मराठा आरक्षण उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी भेट दिली. मराठा आणि धनगर समाजाचा सरकारने आरक्षणाचा तिढा सोडवावा अशी मागणी केली. तसेच येत्या काळात मराठा आणि धनगर समाज एकत्र येऊन आंदोलन करू असा इशारा दिला. तसेच धनगर समाज आणि मराठा समाज एकत्र येऊन गावबंदी करणार असा इशारा दिला.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Sanjay Raut: "ते पुन्हा येणार असतील तर स्वागत", संजय राऊतांचा फडणवीसांना टोला