Manoj Jarange :  उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), शरद पवार (Sharad Pawar) आणि नाना पटोले (Nana Patole) यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. जर विरोधक भूमिका स्पष्ट करत नसतील तर सरकराने मराठा आरक्षणाचा निर्णय मार्गी लावावा, असे वक्तव्य मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. 


मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आज मूळ गावी मातुरी येथे यात्रेसाठी निघालो आहे. आमचं मूळ गाव आहे तिथे दर्शनासाठी जाणार आहे. आधी झालेला राडा आणि माझ्या दौऱ्याचा काहीही संबंध नाही. सरकारशी बोलणं झालं नाही, पाऊस सुरू आहे, ते त्यात व्यस्त आहेत. त्यामुळे त्यांना आम्ही त्रास देत नाही. 29 ऑगस्टला सर्व मराठा समाज एकत्र येणार आणि त्यावेळी ठरवणार विधानसभा निवडणुक लढवायची की नाही, मला राजकारणात जायचं नाही, पण आता पर्याय नाही, असे त्यांनी म्हटले आहे. 


ठाकरे, पवार, पटोलेंनी भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा...


ते पुढे म्हणाले की, आपल्या समाजाला मोठं करायचं असेल तर सर्वांनी एकत्र यायला पाहिजे आम्ही सर्वसामान्य गोरगरिबांसाठी लढणार आहे. भाजपच्या लोकांचे डोके काम करत नाही. मला थांबवण्यासाठी प्रयत्न नाही. आम्ही त्यांना भाव देत नाही. शेवटी मराठ्यांपुढे शांत बसले नाही तर तुमचं राजकीय करिअर मराठा संपवून टाकेल, असा इशारा त्यांनी भाजपचा नेत्यांना दिलाय. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), शरद पवार (Sharad Pawar) आणि नाना पटोले (Nana Patole) यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. मराठे समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिले पाहिजे की नाही. जर विरोधक भूमिका स्पष्ट करत नसतील तर सरकराने मराठा आरक्षणाचा निर्णय मार्गी लावावा, विरोधकांची वाट पाहू नये, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. 


मनोज जरांगेंनी पुढील उपोषण येवल्यात करावे


दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना पुढील उपोषण येवल्यात करेन, असा इशाराच छगन भुजबळांना दिला होता. यानंतर आता येवला तालुक्यातील पुरणगाव आणि एरंडगावच्या ग्रामस्थांनी मनोज जरांगेंनी पुढील उपोषण येवल्यात करावे, अशी मागणी केली आहे. उपोषणासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या आणि जबाबदारी स्वीकारण्याचा ठराव देखील ग्रामसभेत करण्यात आला आहे. त्यामुळे आता मनोज जरांगे यांचे पुढील उपोषण येवल्यात होणार का? मनोज जरांगेंची छगन भुजबळांच्या बालेकिल्ल्यात एन्ट्री होणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


आणखी वाचा 


माझा पट्टा तुटला तर मग कठीण होईल, राणे साहेबांवर मी आणखी उत्तर दिलं नाही, मनोज जरांगे म्हणाले..