छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणावर उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांची तब्येत (Manoj Jarange Health Update) अचानक खालावली आहे. डॉक्टरांकडून जरांगे यांची तपासणी सुरू असून त्यांना पुन्हा एकदा सलाईन लावली आहे. तसेच जरांगे यांच्या हृदयाची तापासणीही करण्यात येत आहे. शुक्रवारी बीड दौऱ्यापासून जरांगे यांना अस्वस्थ वाटत असल्याची माहिती आहे. 


गेल्या काही दिवासांपासून मनोज जरांगे यांची दगदग वाढली असल्याने त्यांची तब्येत खालावली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. मनोज जरांगे यांची सध्या ईसीजी आणि टूडी इको चाचणी करण्यात येत आहे. 


सततच्या प्रवासामुळे तब्येत खालावली


मनोज जरांगे यांनी शुक्रवारी बीड जिल्ह्याचा दौरा केला. त्यावेळी त्यांच्या कमरेचं दुखणं वाढलं होतं. त्यानंतर आज त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात त्यांची ईसीजी आणि इको टूडी चाचणी करण्यात आली आहे.


मनोज जरांगे यांना प्रवासामुळे त्रास झाला असून घाबरून जाण्याचं काही कारण नाही असं डॉक्टरांनी माहिती दिली आहे. अजून काही तपासणी केल्यानंतर डॉक्टर यासंदर्भात माहिती देतील. नेमक्या कोणत्या कारणामुळे मनोज जरांगे यांना हा त्रास झाला याची माहिती थोड्या वेळात डॉक्टर देणार आहेत. 


ही बातमी वाचा: