जालना : मी कशात नसणारे म्हणणारे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे आता उघडे पडले असून त्यांनीच लक्ष्मण हाके यांचे आंदोलन उभं केल्याचा आरोप मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केला. राज्यात जर जातीय दंगली झाल्या तर त्याला फक्त छगन भुजबळ हेच जबाबदार असणार असा इशाराही त्यांनी दिला. वडीगोद्री येथे सुरू असलेलं आंदोलन हे मॅनेज असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला. आमच्या कुणबी नोंदी या मूळच्या असून आम्ही ओबीसींमध्येच आहोत असंही जरांगे यांनी म्हटलं. सरकारने आणि ओबीसी नेत्यांनी जर मराठ्यांची वाटच लावायची ठरवली असेल तर आमचा नाईलाज आहे, होणारे परिणाम भोगायला तयार राहा असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला.
वडीगोद्री आंदोलन हे मॅनेज
सत्ताधारी आणि ओबीसी नेते हे मराठा आरक्षणाच्या विरोधात असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला. ते म्हणाले की, राज्य सरकार ठरवून मंत्री पाठवू लागले. रकारच मराठ्यांवर अन्याय करत आहेत. म्ही आधीच ओबीसींमध्ये आहोत, आम्ही कुणाचं काढून घेत नाही. उलट आमच्याच आरक्षणामध्ये ते आहेत. ओबीसींमध्ये आमच्या नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे कुणबी नोंदी सापडल्याने आम्ही ओबीसी आहोत. सरकारने अशा लाखो कुणबी नोंदी दाबून ठेवल्या आहेत.
मराठ्यांना राग येत नसेल का?
त्यांना मराठ्यांचा इतका राग येत असेल तर मराठ्यांना काहीच वाटत नसेल का? मराठ्यांना राग येत नसेल का? असा सवाल मनोज जरांगे यांनी विचारला. ते म्हणाले की, आमच्या मागण्या पूर्ण होतील. एकही कुणबी नोंद रद्द होणार नाही. सत्तेत उभं राहून मला जातीवादी म्हणता. कोण जातीवाद आहे? मी फक्त कणखर मराठ्यांच्या मागे उभं आहे. रस्त्यावर उतरण्याची भाषा करत असतील, तर मी काय करु? मराठ्यांनीच उत्तर द्यावं. मराठ्यांना आरक्षण मिळायला नको काय़? मराठ्यांच्या नेत्यांना माझा प्रश्न आहे. मराठ्यांची पोरं नोकरीला लागली नाही पाहिजे का? आरक्षण किती मोठी गोष्ट आहे, हे समजत नाही काय़?
गिरीश महाजन, अतुल सावे मराठ्यांचं मतदान घेत नाहीत का?
आतापर्यंत मराठ्यांचं मतदान घेताना गोड वाटत होतं. पण आरक्षणाची मागणी केल्यानंतर मात्र आता आम्ही विरोधक झालो काय असा सवाल मनोज जरांगे यांनी ओबीसी नेत्यांना विचारला. आतापर्यंत गिरीश महाजन, अतुल सावे यांनी मराठ्यांचं मतदान घेतलं नाही का, ओबीसी नेत्यांनी मराठा मतदान घेतलं नाही का? असा सवाल जरांगे यांनी उपस्थित केला.
पंकजा मुंडे, भुजबळांना यांना टोला
काही लोक फेसबुकवर लिहितात की ओबीसी आंदोलन हे घटनेला धरून आहे, पण मराठ्यांचा प्रश्न यांना दिसत नाही का असा सवाल विचारत जरांगे यांनी पंकजा मुंडे यांना टोला लगावला. अंधारात लोकांना सपोर्ट करायचा आणि आता उजेडात समोर यायंच, आता यांचं सत्य समोर आलंय असं म्हणत त्यांनी छगन भुजबळांवरही निशाणा साधला.
ओबीसी आरक्षणासाठी त्यांचे सगळे नेते एकत्र आले. मराठा नेत्यांनी आता तरी शाहणं व्हावं असं मनोज जरांगे म्हणाले.
ही बातमी वाचा: