Jalna News: जालना शहरात (Jalna City) धक्कादायक घटना समोर आली असून, मोती तलावातील शेकडो मासे (Fish) मृत पावल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. जालना पालिकेने शनिवारी‎ सर्व मासे गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला आहे. तर यावेळी जवळपास चार टन मासे मृत पावल्याचे समोर‎ आले आहे.‎ तसेच महाराष्ट्र प्रदूषण ‎नियंत्रण मंडळाने (Maharashtra Pollution Control Board) या प्रकाराची दखल घेतली‎ आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, मासे मृत पडण्याचे कारण प्रशासनाकडून शोधले जात आहे. 


जालना शहरातील मोती तलावाच्या पाण्यावर मृत मासे‎ तरंगत असल्याची घटना शुक्रवारी उघडकीस‎ आली. या प्रकाराने परिसरात आणि शहरात एकच खळबळ उडाली होती.‎ दरम्यान याची माहिती मिळताच पालिकेने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण‎ मंडळाला याबाबत कळवले आहे.  माहिती मिळताच मंडळाच्या‎ अधिकाऱ्यांनी मोती तलावाची पाहणी करून,  मृत‎ माशांचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. तसेच या मागील कारण शोधण्यासाठी अधिकाऱ्यांनी तलावाची पाहणी केली. मात्र प्रथमदर्शनी तपासणीदरम्यान ‎कोणत्या मार्गाने प्रदूषण झाले याची माहिती पथकाला मिळू‎ शकली नाही. मात्र माशांचे नमुने तपासल्यानंतर‎ मासे कशामुळे मृत पावले हे समोर येणार आहे. 


तलावात होणारे प्रदूषण थांबवण्याची मागणी 


जालना शहरातील मोती तलावाच्या पाण्यावर मृत मासे‎ तरंगत असल्याची माहिती मिळाल्यावर पालिका प्रशासनाने देखील तलावाची पाहणी केली. त्यानंतर नगरपालिकेच्या स्वच्छता‎ विभागाने शनिवारी सकाळी सर्व मासे एकत्र‎ करून त्याची डंपिंग ग्राउंडवर विल्हेवाट लावली आहे.‎ तसेच शनिवारी नव्याने मासे मृत पावल्याचा‎ प्रकार समोर आलेला नाही अशी माहिती पालिकेच्या‎ स्वच्छता विभागाकडून देण्यात आला आहे. विशेष म्हणजे या घटनेनंतर देखील मोती तलावात वाहने धुण्याचा आणि कपडे‎ धुण्याचा प्रकार शनिवारीही सुरूच होता. त्यामुळे तलावात होणारे प्रदूषण थांबवण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. 


नागरिकांचा संताप! 


दरम्यान, मोती तलावातील मृत मासे बाहेर काढल्यावर नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ते गांधीनगर‎ रेल्वे उड्डाणपुलाखाली उघड्यावर आणून टाकल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. हा मुक्या प्राण्यांसह नागरिकांच्या जीविताशी‎ खेळण्याचा प्रकार असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे या मृत माशांची तात्काळ‎ योग्य रीतीने विल्हेवाट न लावल्यास थेट पालिकेत‎ हे मासे आणून टाकू, असा स्थानिकांनी दिला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Abdul Sattar: कृषीमंत्र्यांना नुकसानभरपाईची आठवण करून देण्यासाठी शेतकरीपुत्रांनी गाठलं मंत्रालय