Fall in flower prices : सध्या राज्यातील फूल उत्पादक शेतकरी (Flower Farmers) संकटात सापडला आहे. कारण फुलांच्या दरात (flower prices) मोठी घसरण झाली आहे. यामुळं शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. जालना (Jalna) जिल्ह्यातील परतूर येथे फुलांना भाव मिळत नसल्यानं फुल उत्पादक शेतकऱ्यांनी रस्त्यावर फुले फेकून आपला संताप व्यक्त केला. गुलाब, मोगरा, गलांडा यासह इतर फुलांना बाजारात किलोला 5 रुपयांचा दर मिळत आहे. त्यामुळं शेतकरी आक्रमक झाले आहेत.  


रस्त्यावर फुले फेकत, सरकारचा निषेध


फुलांच्या दरात घसरण झाल्यामुळं फुल उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च सोडा माल वाहतुकीचा खर्च निघत नाही. त्यासाठी खिशातून पैसे द्यावे लागत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. दरम्यान जालना जिल्ह्यातील परतूरमधील शेतकऱ्यांनी रस्त्यावर फुले फेकत, सरकारचा निषेध व्यक्त केला. 


Flower prices : फुलांचा उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकरी आक्रमक 


गेल्या दोन महिन्यांपासून फुलांचा दरात घसरण झाली आहे. किलोला पाच ते दहा रुपयांचा दर मिळत आहे. या दरातून आमचा तोडणीचा खर्च निघत नाही. औषधे फवारणीचा मोठा खर्च आहे. मात्र, सध्या मिळणाऱ्या दरातून तोही खर्च निघत नाही. फुलाला किलोला पाच रुपयांचा दर मिळत असल्यानं आम्ही आज निषेध केला आहे. फुले बाजारात न पाठवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. आज आम्ही रस्त्यावर फुले फेकून सरकारचा निषेध केल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.


सध्याच्या दरातून वाहनाचे भाडेही निघत नाही


सध्या फुलाला मिळत असललेल्या दरातून वाहनाचे भाडे देखील निघत नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. त्याच्या निषेधार्थ आम्ही आज रस्त्यावर फुले फेकली आहेत. फुलाचं उत्पादन घेण्यासाठी आमचा मोठा खर्च होतो. औषधांच्या फवारणीचा खर्च तसेच मजुरांचा खर्च मोठा आहे. मात्र, सध्या मिळणाऱ्या दरातन आमचा खर्च निघत नसल्याची माहिती चिंचोलीच्या शेतकऱ्यांनी दिली. शासनानं फुल उत्पादक शेतकऱ्यांकडे लक्ष देऊन आम्हाला अनुदान द्यावं अशी मागणी काही शेतकऱ्यांनी केली आहे.


Rain : अवकाळीमुळं आधीच शेती पिकांचं नुकसान


आधीच राज्यात अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या हाती आलेली पिकं वाया गेली आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा झाला आहे. केळी, आंबा, द्राक्ष बागांचेही मोठं नुकसान झालं आहे. तसेच हरभरा, कांदे तसेच भाजीपाला पिकांनाही फटका बसला आहे. सध्या कांद्याच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. त्याचबरोबर आता फुलांच्या दरातही घसरण झाल्यानं शेतकरी अडचणीत सापडले आहेत. 


महत्त्वाच्या बातम्या:


Onion News : बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक वाढली, दरात घसरण ; अनुदान मिळण्याचा आज शेवटचा दिवस