Jalna Accident:जालना जिल्ह्यातील वडीगोद्रीजवळ सौंदलगाव फाट्यावर मंगळवारी दुपारी एक कार अपघात झाला. धुळे-सोलापूर महामार्गावर (Dhule Solapur Highway) हा अपघात झाला असून, यात एका आई आणि तिच्या अडीच वर्षांच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

रोहिणी चव्हाण (32) आणि तिची मुलगी नुरवी चव्हाण (वय अडीच वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. हे सर्वजण कारने जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे कार रस्त्याच्या कडेला गेली आणि उलटली. रस्त्यावरून कार पलट्या मारत खाली गेल्याने कारचा मोठा अपघात झाला . (Jalna Accident)

चालकाचे नियंत्रण सुटले, कार पलटी

मिळालेल्या माहितीनुसार, धुळे-सोलापूर महामार्गावरून कारमधील सर्व प्रवासी सौंदलगाव फाट्याच्या दिशेने जात होते. दरम्यान, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कारने रस्त्याच्या कडेला जाऊन जोरदार पलटी घेतली. अपघाताची तीव्रता इतकी होती की, कारमधील रोहिणी चव्हाण (वय ३२ वर्षे) आणि तिची अडीच वर्षांची मुलगी नुरवी चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात होताच आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केलं. पोलिसांनाही तत्काळ माहिती देण्यात आली. गंभीर जखमी झालेल्या तिन्ही प्रवाशांना तत्काळ उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरमधील खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.  वडीगोद्री पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असून अपघाताचे कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. या अपघातात मायलेकींचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत असून परिसरात मोठी खळबळ उडाली होती.

अजित पवारांचा बीड दौरा, रुग्णांना फटका

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, अजित पवारांच्या या दौऱ्याचा रुग्णांना फटका बसला आहे.  बीडच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णालयात जाण्यापासून रोखले जात आहे. उपमुपख्यमंत्री अजित पवार यांच्या या दौऱ्याचा फटका रुग्णांना बसत आहे. सकाळपासून रुग्णांना जेवण नसल्याने नातेवाईकांना काळजी वाटत आहे. औषध घेण्यासाठी जेवण मिळत नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. 

हेही वाचा:

नातेवाईकांना रुग्णालयात जाण्यापासून रोखले, अजित पवारांच्या बीड दौऱ्याचा रुग्णांना फटका