Beed : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, अजित पवारांच्या या दौऱ्याचा रुग्णांना फटका बसला आहे. अजित पवार हे अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले आहेत. रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णालयात जाण्यापासून रोखले जात आहे. रुग्णांचा डब्बाही आतमध्ये जाऊ दिला जात नाही. व्हीआयपी दौऱ्याचा सर्वसामान्य रुग्णांना फटका बसत आहे.

रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णालयात जाण्यापासून रोखले 

बीडच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णालयात जाण्यापासून रोखले जात आहे. उपमुपख्यमंत्री अजित पवार यांच्या या दौऱ्याचा फटका रुग्णांना बसत आहे. सकाळपासून रुग्णांना जेवण नसल्याने नातेवाईकांना काळजी वाटत आहे. औषध घेण्यासाठी जेवण मिळत नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. 

शिवराज दिवटे मारहाण प्रकरणात मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने घेतली अजित पवारांची भेट

दरम्यान, अजित पवार परळीमध्ये  दाखल झाल्यावर कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. न्याय द्या अजितदादा न्याय अशी घोषणाबाजी करण्यात आली आहे. शिवराज दिवटे मारहाण प्रकरणात मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने अजित पवार यांचा ताफा अडवून भेट घेतली. आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे. 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीडचे पालकमंत्री झाल्यानंतर आज (19 मे) प्रथमच परळीच्या दौऱ्यावर आहेत. परळीतील विविध विकास कामे आणि महत्वपूर्ण बैठका आणि बीड (Beed) जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित दादांनी बैद्यनाथ (Vaidhynath Jyotirling Temple) येथील मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि त्यानंतर त्या ठिकाणी करण्यात आलेल्या विकास कामाची पाहणी केली असता यावेळी अजित दादांनी कंत्राटदाराला धारेवर धरत खडे बोल सुनावल्याचे बघायला मिळाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे यांनी वैद्यनाथाला मंत्राच्या जयघोषात रुद्राभिषेक केलाय. यानंतर महाआरती करण्यात आली. 

महत्वाच्या बातम्या:

Ajit Pawar: अजित दादांनी कंत्राटदाराला धरलं धारेवर; वैजनाथ मंदिराच्या पायऱ्यांच्या मुद्यावरून सुनावले खडे बोल