Jalna News : अखेर जालना नगरपालिकेचं (Jalana) आजपासून महानगरपालिकेत (Municipal Corporation) रूपांतर झालं. राज्याच्या उप सचिवांच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे सूचना जारी करण्यात आली आहे. जालना महापालिका ही मराठवाड्यातील (Marathwada) पाचवी महापालिका आहे. 


9 मे 2023 ला महानगरपालिकेचे प्रारूप प्रसिद्ध करून आठ जून 2023 पर्यंत हरकती मागवण्यात आल्या होत्या. या काळात 8 हरकती आल्या होत्या. त्या हरकती शासनाकडे पाठवण्यात आल्या होत्या. त्यावरून  शासन स्तरावर निर्णय होऊन आज जालना नगरपालिकेच्या हद्दीतील संपूर्ण क्षेत्र महानगरपालिका म्हणून घोषित करण्यात आले आहे. 


अशी आहे जालना शहराची ओळख... 


मराठवाड्यात जालना जिल्ह्याची एक वेगळी ओळख आहे. स्टील इंडस्ट्रीमुळे बांधकामासाठी लागणारे स्टील राज्यभरातच नव्हे तर देशातील अनेक भागात जालना जिल्ह्यातून जाते. त्यामुळे या शहरात मोठी औद्योगिक उलाढाल पाहायला मिळते. सोबतच कृषीच्या दृष्टीने देखील जिल्ह्याची वेगळी ओळख आहे. मोसंबीचं मोठ उत्पादन होत असून, दिल्लीपर्यंत जालना जिल्ह्याची मोसंबी विक्रीसाठी जाते. राजकीयदृष्ट्या देखील जालना नेहमी चर्चेत असतो. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा जिल्हा म्हणून जालना ओळखला जातो. 


महापालिका जाहीर करण्याची अनेक वर्षांची मागणी 


जालना नगरपालिकेला महानगरपालिका जाहीर करण्याची मागणी अनेक वर्षांपासून सुरू होती. जालन्याची स्टील इंडस्ट्रीज म्हणून ओळख आहे. तर मोसंबी उत्पादक जिल्हा म्हणून देखील जालना शहराची राज्यभरात ओळख आहे. त्यात वाढती लोकसंख्या पाहता आणि शहराच्या विकासाच्या दृष्टीने जालना महानगरपालिका घोषित करावी यासाठी मागणी करण्यात येत होती. 


जालना शहराची ओळख काय?


मराठवाडा विभागात जालना शहराची एक वेगळी छाप आहे. स्टील इंडस्ट्रीज असणारा जिल्हा म्हणून जालनाची ओळख आहे. त्याशिवाय, मोसंबी उत्पादक जिल्हा म्हणूनही ओळखले जाते.  मोसंबीचं मोठ उत्पादन होत असून, दिल्लीपर्यंत जालना जिल्ह्याची मोसंबी विक्रीसाठी जाते. राजकीयदृष्ट्या देखील जालना नेहमी चर्चेत असतो.


राज्यातील एकूण महानगरपालिका


बृहन्मुंबई महानगरपालिका, पुणे महानगरपालिका (PMC), नागपूर महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, नाशिक महानगरपालिका, कल्याण- डोंबिवली महानगरपालिका, वसई-विरार शहर महानगरपालिका, छत्रपती संभाजीनगर, महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, सोलापूर महानगरपालिका, मीरा-भाईंदर महानगरपालिका, भिवंडी- निजामपूर महानगरपालिका, अमरावती महानगरपालिका, नांदेड-वाघाळा महानगरपालिका, कोल्हापूर महानगरपालिका, अकोला महानगरपालिका ,उल्हासनगर महानगरपालिका, सांगली, मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका, मालेगाव महानगरपालिका, जळगाव महानगरपालिका, लातूर महानगरपालिका, धुळे महानगरपालिका, अहमदनगर महानगरपालिका, चंद्रपूर महानगरपालिका, परभणी महानगरपालिका, पनवेल महानगरपालिका, इचलकरंजी महानगरपालिका