Income Tax Department Raid In Jalna : जालना (Jalna) येथे एका नामांकित स्टील कंपनीवर (Steel Company) आयकर विभागाकडून धाड (Income Tax Department) टाकण्यात आली आहे. कर चूकवेगिरीच्या संशयावरून मुंबईतील (Mumbai) आयकर विभागाच्या पथकाकडून कालपासून हे धाडसत्र सुरू असल्याची माहिती मिळत आहे. यात आयकर विभागाकडून कंपनीतील काही महत्वाची कागदपत्रे आणि संगणकातील डेटा ताब्यात घेतल्याची देखील माहिती समोर येत आहे. संबंधित कंपनीमध्ये जमा खर्चाचा संशयास्पद व्यवहार आढळल्याची देखील माहिती आहे. 


जालना येथे एका नामांकित स्टील कंपनीत आयकर विभागाच्या तब्बल 200 जणांच्या पथकाकडून  गुरुवारी पहाटे 6 वाजेदरम्यान अचानक धाड टाकण्यात आली. विशेष म्हणजे या कंपनीसह संचालक व एका उच्चपदस्थ कर्मचाऱ्यांच्या घरांवर एकाच वेळी छापे टाकण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या जमा- खर्चाच्या व्यवहारात काही संशयास्पद बाबी आढळून आल्याने  ही कारवाई करण्यात आली आहे. तर, आतापर्यंत कारवाईत नेमकं काय काय मिळून आले याची अधिकृत कोणतेही माहिती समोर आलेली नाही. 


अन् पथक अचानक धडकलं...


जालना शहरात अनेक स्टील कंपन्या आहेत. काही नामंकित कंपन्यांमधील स्टील देशभरात विक्रीसाठी जाते. मात्र, अनेकदा कर चुकवल्या प्रकरणी किंवा व्यवहारात संशयास्पद बाबी आढळून आल्यास वेगवेगळ्या विभागाकडून कारवाया केल्या जातात.  अशीच कारवाई गुरुवारी करण्यात आली आहे. जालना एमआयडीसीमध्ये असलेल्या या स्टील कंपनीत गुरुवारी सकाळी 6 वाजता अचानक आयकर विभागाचं पथक पोहचलं. फक्त कंपनीच नाही तर कंपनीच्या संचालकासह एका उच्चपदस्थ कर्मचाऱ्यांच्या घरांवर देखील धाड टाकण्यात आली आहे. कालपासून सुरु असलेली चौकशी अजूनही सुरूच असल्याची माहिती मिळत आहे. 


एकाला ताब्यात घेतलं...


200 जणांचे आयकर विभागाचे पथक गुरुवारी जालन्यात दाखल झाले. मुंबईतील हे पथक असल्याचे बोलले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित स्टील कंपनीच्या व्यवहारात संशयास्पद बाबी आढळून आल्याने आयकर विभागाने ही कारवाई केली आहे. विशेष म्हणजे, या कंपनीतील मालाच्या खरेदी-विक्री आणि इतर आर्थिक व्यवहार पाहणाऱ्या एकाला जालना तालुक्यातील दरेगावातून राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आल्याची देखील माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे यापूर्वी देखील जालना येथील स्टील कंपन्यांवर जीएसटी विभागासह आयकर विभागाने कारवाया केल्या आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Jalna : चार्जिंगला लावलेला मोबाईल कानाला लावला अन् स्फोट झाला, 5 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू