जालना (आंतरवाली सराटी) : मनोज जरांगेंच्या (Manoj Jarange) उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे. मनोज जरांगे यांनी सरकारला तसेच विरोधकांना विशेष अधिवेशन बोलवून मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी मागणी केलीये. तसचं ओबीसीमधील काही जातींना कोणत्या निकषावर आरक्षण दिलंय हे जाहीर करावं असंही आवाहन त्यांनी केलंय. तर उद्या आंतरवाली सराटीत बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, जरांगे मराठा आंदोलकांशी या बैठकीत चर्चा करून पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार आहे. त्यामुळे जरांगे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


शुक्रवारी मनोज जरांगे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषेदत बोलतांना म्हटले आहे की, मंडल आयोगाने ओबीसी समाजाला 14 टक्के आरक्षण दिले होते. मात्र, कशाच्या आधारे आणि कोणत्या निकषानुसार 14 टक्के आरक्षण चार वर्षात 30 टक्के करण्यात आले. याचे उत्तर महाराष्ट्रातील जनेतला सरकराने शनिवारपर्यंत दिले पाहिजे. तसेच, ज्या-ज्या जाती आरक्षणात घालण्यात आल्या, त्या जातीच्या आतापर्यंत किती पोटजाती आरक्षणात घालण्यात आल्या आहेत. सोबतच या पोटजाती आरक्षणात घालतांना कोणते पुरावे ग्राह्य धरण्यात आल्या आहेत हे देखील सरकराने सांगितले पाहिजे असे जरांगे म्हणाले आहे. 


सरकारचे षडयंत्र सुरु


मराठा समाजाला आरक्षण देतांना खूपच काळजी घेतली जात आहे. सरकराला जसं आरक्षण सोन्यासारखं आणून तोलून द्यायचे आहे. मराठ्यांच्या बाबतीत सध्या सरकारची अशी भूमिका आहे. मात्र, इतरांना आरक्षण गचागच वाटून टाकले. त्यामुळे आता हे सर्व काही उघडं पडणे गरजेचे आहे. आरक्षणासाठी मराठा समाज उद्धवस्त होऊ लागले असून, लोकं जीव देत आहे. पण मराठे मोठे होऊ नयेत म्हणून सरकारचे षडयंत्र सुरु आहे. आतापर्यंत आरक्षण कसे दिले आता सर्वकाही उघड करणार आहे. सरकारने यावर आता उत्तर दिले पाहिजे, आणि ते उत्तर कसे देत नाही ते आता आम्ही पाहतोच. तसेच त्यांनी उत्तर दिले नाही तर यापूर्वी त्यांनी सांगितलेलं सर्वकाही खोटे होते असाच याचा अर्थ होतो, असेही जरांगे म्हणाले. 


उद्या आंतरवाली सराटीत बैठकीचे आयोजन


सरकारला 40 दिवसांची मुदत देऊन देखील मराठा आरक्षणाचा तिढा सुटला नसल्याने मनोज जरांगे पुन्हा उपोषणाला बसले आहे. दरम्यान, आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. तर, उद्या आंतरवाली सराटीत बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, जरांगे मराठा आंदोलकांशी या बैठकीत चर्चा करून पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार आहे. त्यामुळे जरांगे यांच्या भूमिकेकडे मराठा समजाचे लक्ष लागले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Kiran Mane : "जरांगे पाटलांच्या धैर्याला अन् चिकाटीला सलाम"; किरण मानेंची मराठा आरक्षणाबद्दल खास पोस्ट