जालना : ब्राम्हण समाजासाठी (Brahmin Society) स्वतंत्र असे परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी, तसेच ब्राम्हण समाजातील मुलांना उच्च शिक्षण मोफत देण्याच्या मागणीसह अन्य मागण्यासाठी गेल्या सहा दिवसांपासून जालना शहरात उपोषण सुरू आहे. दरम्यान, हे उपोषण मागे घेण्याची विनंती करण्यासाठी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी फोन करून उपोषणकार्त्यांशी चर्चा केली. तसेच, उपोषण मागे घेण्याची केली विनंती देखील केली. मात्र, लेखी आश्वासन मिळेपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका उपोषणकर्ते दीपक रणनवरे (Deepak Rananavere) यांनी घेतली आहे. 


ब्राह्मण समाजासाठी भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याच्या मागणीसाठी ब्राह्मण समाजसेवक दीपक रणनवरे यांनी गेल्या सहा दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनास पाठिंबा म्हणून रविवारी सकाळी अकरा ते पाचवाजेपर्यंत ब्राह्मण समाजाच्यावतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या उपोषणास समाजबांधवांनी मोठा प्रतिसाद दिला. शहरासह संपूर्ण जिल्हा व राज्यभरातून अनेक समाजबांधव यात सहभागी झाले होते. तर, आज खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून दीपक रणनवरे यांच्याशी संवाद साधला. तसेच, उपोषण मागे घेण्याची विनंती केली. 


ब्राह्मण समाजाच्या मागण्या...



  • ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्यांना सर्व शिक्षण मोफत करण्यात यावे.

  • ब्राह्मण समाजातील आर्थीक मागास घटकातील तरुणांना व्यवसायीक मदतीसाठी परशुराम आर्थीक विकास महामंडळ स्थापन करावे यासाठी एक हजार कोटीची तरतुद करण्यात यावी.

  • ब्राह्मण समाजातील विद्याथ्र्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतीगृह उभारावे / स्थापन करण्यात यावे.

  • ब्राह्मण पुरोहितांना मासिक 5 हजार रुपये मानधन देवुन त्यांची विविध मंदीरात नियुक्ती करावी ज्याद्वारे प्रत्येक मंदिरात नित्यपुजा लावली जावी.

  • ब्राह्मण समाजातील सेवकांना मिळालेल्या इनामी जमीन वर्ग-2मधुन वर्ग-1वर्गात बदल करण्यात याव्यात त्याचा मालकी हक्क कायम करण्यात यावा.

  • ब्राह्मण समाजाच्या सुरक्षिततेसाठी विशेष कायदा करुन सामाजिक विडंबनातून मुक्ता करण्यात यावी.

  • परंपरागत राज्यातील मंदीरे ज्यात्या पुर्ववत वंशपरंपरागत व्यवस्थापनाकडे हस्तांतरीत करण्यात यावी जेणे करून मंदीराचे पावित्र्य व व्यवस्थापन सुस्थीतीत अबाधीत राहील.

  • ब्राह्मण समाजाच्या सामाजिक,आर्थीक व शैक्षणीक पातळीवर झालेल्या बदलाचा चांगला वाईट परिणाम शोधण्यासाठी अभ्यास गटाची-आयोगाची शासनस्तरावर नेमणुक करण्यात यावी. 


नेतेमंडळीकडून प्रकृतीची विचारपूस ...


गेल्या सहा दिवसांत विविध लोकप्रतिनिधी, राजकीय पुढारी, विविध समाजाच्या संघटना, प्रतिनिधींनी भेट घेऊन ब्राह्मण समाजाच्या आंदोलनास पाठिंबा दिला. दीपक रणनवरे यांच्या आंदोलनास राजकीय पदाधिकाऱ्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थिती लावून पाठिंबा देत आहेत. राज्याचे वन व पर्यावरण मंत्री सुधीर मुनगुंटीवार, पालकमंत्री अतूल सावे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी रविवारी दुपारी उपोषणकर्ते दीपक रणनवरे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली तर पालकमंत्री सावे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत फोनद्वारे संवाद साधून देण्याचे आश्वासन दिले.


प्रकृती खालावली...


दरम्यान आज उपोषणाचा सातवा दिवस असून मुख्य उपोषणकर्ते दीपक रणनवरे यांची प्रकृती खालवल्याचे दिसून आले. मोठया प्रमाणात अशक्तपणा आला असून, किडणीवर काही प्रमाणात सूज आल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. एकूणच प्रतिकार शक्ती कमी होत असल्याचे यावेळी प्रकर्षाने दिसून येत आहे. मात्र, लेखी आश्वासन मिळेपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका रणनवरे यांनी घेतली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


मोठी बातमी! मराठा, ओबीसी आणि धनगर समाजानंतर ब्राम्हण समाजही जालन्यात आक्रमक