जालना : मागील काही दिवसांत जालना (Jalna) जिल्हा आंदोलनाचा केंद्र बनला आहे. मराठा आरक्षण आंदोलन (Maratha Reservation Protest), ओबीसी सभा (OBC Sabha), धनगर आरक्षणाची (Dhangar Reservation) मागणी यामुळे चर्चेत आलेल्या जालन्यात आता ब्राह्मण समाजाने (Brahmin society) देखील आपल्या मागण्यांसाठी आमरण उपोषणाचा हत्यार उपसलय. परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना, ब्राह्मण समाजाच्या विद्यार्थ्यांना मोफत उच्च शिक्षण आणि विद्यार्थ्यांनसाठी वसतिगृहाची स्थापना करावी यासह इतर मागण्यासाठी जालन्यात समस्त ब्राह्मण संघर्ष समितीच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येत आहे. 


जालना शहरातील महात्मा गांधी चौकात ह्मण समाजाच्या वतीने आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली असून, महाराष्ट्र सरकारने तातडीने परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे या प्रमुख मागणीसाठी दीपक रणवरे हे जालन्यात आमरण उपोषणाला बसले आहेत. मागील 15 वर्षांपासून ब्राम्हण समाजाने आपल्या मागण्यांचे निवेदन देऊन सरकारकडे मागण्या पूर्ण करण्याची विनंती केली. मात्र तरी सरकारने याबाबत कुठलाही निर्णय न घेतल्याने जालन्यात गांधी चमन परिसरात ब्राम्हण समाजाचे दीपक रणवरे यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केलीय. 


जालन्यात आजपासून उपोषणाला सुरवात


सरकारकडून ब्राह्मण समाजाला दुर्लक्षित केल्या जात असल्याचा आरोप करत ब्राह्मण समाजाच्या आर्थिक विकास महामंडळाच्या स्थापनेसाठी स्वतंत्र अभ्यास गट करावा आणि इतर समाजाप्रमाणे ब्राह्मण समाजासाठी आर्थिक विकास महामंडळाची लवकरात लवकर स्थापना करावी अशी मागणी करण्यात येतेय. दरम्यान, आपल्या मागण्यासाठी ब्राह्मण समाजाच्या वतीने उपोषण करण्यात येत आहे. जालन्यात आजपासून या उपोषणाला सुरवात झाली आहे. 


ब्राह्मण समाजाच्या मागण्या...



  • ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्यांना सर्व शिक्षण मोफत करण्यात यावे.

  • ब्राह्मण समाजातील आर्थीक मागास घटकातील तरुणांना व्यवसायीक मदतीसाठी परशुराम आर्थीक विकास महामंडळ स्थापन करावे यासाठी एक हजार कोटीची तरतुद करण्यात यावी.

  • ब्राह्मण समाजातील विद्याथ्र्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतीगृह उभारावे / स्थापन करण्यात यावे.

  • ब्राह्मण पुरोहितांना मासिक 5 हजार रुपये मानधन देवुन त्यांची विविध मंदीरात नियुक्ती करावी ज्याद्वारे प्रत्येक मंदिरात नित्यपुजा लावली जावी.

  • ब्राह्मण समाजातील सेवकांना मिळालेल्या इनामी जमीन वर्ग-2मधुन वर्ग-1वर्गात बदल करण्यात याव्यात त्याचा मालकी हक्क कायम करण्यात यावा.

  • ब्राह्मण समाजाच्या सुरक्षिततेसाठी विशेष कायदा करुन सामाजिक विडंबनातून मुक्ता करण्यात यावी.

  • परंपरागत राज्यातील मंदीरे ज्यात्या पुर्ववत वंशपरंपरागत व्यवस्थापनाकडे हस्तांतरीत करण्यात यावी जेणे करून मंदीराचे पावित्र्य व व्यवस्थापन सुस्थीतीत अबाधीत राहील.

  • ब्राह्मण समाजाच्या सामाजिक, आर्थीक व शैक्षणीक पातळीवर झालेल्या बदलाचा चांगला वाईट परिणाम शोधण्यासाठी अभ्यास गटाची-आयोगाची शासनस्तरावर नेमणुक करण्यात यावी. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Jalna : अंतरवाली सराटी दगडफेकीतील आरोपी अजित पवार गटाचा तालुकाध्यक्ष, खोटा गुन्हा नोंदवल्याचा आरोप, विजयसिंह पंडित काढणार मोर्चा