जालना : धनगर आरक्षणाच्या (Dhangar Reservation) मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर निघालेल्या मोर्चावेळी आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे समोर आले होते. त्यामुळे, जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक करण्यासह शासकीय व खाजगी वाहनांचे नुकसान केल्या प्रकरणी तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पोलिसांनी 36 ज्ञात आणि दोनशे ते अडीचशे अज्ञात लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याचा 'एफआयआर' समोर आला असून, यात एकूण 36 आरोपींचे नावं समोर आली आहे.
जालना दगडफेक प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक यांच्या फिर्यादीवरून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यात त्यांनी म्हटले आहे की, गांधीचमन येथून निघालेला मोर्चा जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला. यावेळी अचानक काही लोकांच्या जमावाने आरडाओरडा करत आणि शिवीगाळ करत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धाव घेतली. त्यामुळे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी या जमावाला शांततेचे आवाहन करून समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांच्या आवाहनाला कोणतेही प्रतिसाद म देता या जमावाने जिल्हाधिकारी कार्यालयाचे बाहेरील मेन गट उखडून फेकला आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात प्रवेश केला. त्यानंतर या जमावाने शासकीय वाहनांच्या काचा फोडल्या, दुचाकींची तोडफोड केली,झाडांच्या कुंड्यांची तोडफोड केली, दगडफेक करून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या काचा फोडल्या असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार 36 ज्ञात आणि दोनशे ते अडीचशे अज्ञात लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांच्यावर गुन्हा दाखल...
पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या प्रकरणात 36 आरोपींची ओळख पटली असून, त्यांच्या नावासहित गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ज्यात, दीपक बोराडे, कपिल दहेकर, पांडुरंग कोल्हे, शिवाजी भालेकर, गोविंद जाधव, बळीराम खटके, भगवान माथले, निखिल वीर, बाळासाहेब तायडे, शिवाजी तरवडे, नितीन कानाडे, गणेश कोल्हे, अक्षय आटोळे, शिवराम वीर, संतोष कोल्हे, भगवान कावळे, जनार्दन सोरमारे, सोपान भांड, कैलास गोरे, कारभारी आडणे, जनार्दन जारे, कैलास चोरमारे, अशोक गायकवाड, कष्णा खरात, गणेश होळकर, शंकर मुळे, उद्धव पवार, तानाजी शेंडगे, भगवान पाटोळे, रोहन खैरे, रामभाऊ गोरे, रोहित सुरडकर, शिवप्रसाद चितळकर, बाबासाहेब जोशी, शरद चोरमारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोबतच दोनशे ते अडीचशे अज्ञात व्यक्तींच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: