कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून बुडून मृत्यू होणाऱ्यांची मालिका सुरूच आहे. आता राधानगरी बॅक वाॅटरमध्ये तिघांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादाय घटना घडली आहे. दाजीपूर अभयारण्याच्या पायथ्याला भटवाडी परिसरात या तिघांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये एक पुरुष आणि एक महिला तसेच 13 वर्षाच्या मुलगीचा समावेश आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार राधानगरीपैकी भैरीबांबर येथील सतीश टिपूगडे असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. अन्य दोन महिलांची ओळख पटलेली नाही. पोहायला गेल्यानंतर गाळामध्ये रुतल्यानंतर गुदमरून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
वेदगंगा नदीत पाण्याचा अंदाज न आल्याने चौघे बुडाले
दरम्यान, अवघ्या 13 दिवसांपूर्वीच आणूर ता. कागल गावाच्या यात्रेसाठी जितेंद्र विलास लोकरे (वय 36, मुरगूड), सौ. रेश्मा दिलीप येळमल्ले (वय 34, अथणी, कर्नाटक), सौ. सविता अमर कांबळे (वय 27 रुकडी), यश दिलीप येळमल्ले (वय 17, अथणी, कर्नाटक) यांचा वेदगंगा नदीवर कपडे धुण्यासाठी गेले असताना बुडून मृत्यू झाला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने सविता कांबळे आणि रेश्मा दिलीप येळमल्ले या पाण्यात बुडू लागल्या. त्यांना वाचवण्यासाठी जितेंद्र लोकरे आणि यश येळमल्ले पाण्यात उतरले. मात्र, पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने चौघेही पाण्यात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली होती.
इतर महत्वाच्या बातम्या