Sharad Pawar on PM Narendra Modi : महागाई किती वाढली आहे. मला सत्ता द्या असे त्यांनी दहा वर्षापूर्वी सांगितले होते. पन्नास दिवसात महागाई कमी करणार असल्याचं सांगितलं होते. मात्र दहा वर्षात महागाई कमी नाही झाली तर वाढली आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) केली आहे. आज चोपडा येथे महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) रावेर लोकसभा मतदारसंघाचे (Raver Lok Sabha Constituency) उमेदवार श्रीराम पाटील (Shriram Patil) यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.  


शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले की, जळगाव जिल्हा राज्यात महत्वाचा जिल्हा आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा देणारा हा जिल्हा आहे. महात्मा गांधी यांनी जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी चळवळ उभी केली होती. पहिले काँग्रेसचे अधिवेशन फैजपूरमध्ये झाले होते. देशासाठी काम करताना कोणती तमा बाळगली नाही, असे नेते या ठिकाणी होते. महाराष्ट्राची विधानसभा किती उत्तमरित्या चालविता येते हे अरुणभाई गुजराती यांनी दाखवून दिले होते. 


श्रीराम पाटलांना साथ द्या 


जनतेची सेवा केली पाहिजे या जिल्ह्यातून विविध क्षेत्रात पाहायला मिळाले आहे. विधायक कामाचा पुरस्कार करणारा जिल्हा आहे. निवडणुका येतात जातात, पण जनतेच्या समस्या काय त्या कशा सोडवायला हव्या ते पाहायला पाहिजे. आज काय चित्र दिसत आहे? लोकांनी श्रीराम पाटील यांच्यासारखा काम करण्याची इच्छा असणार नवखा उमेदवाराला साथ द्यायला पाहिजे. आज देशात अनेक प्रश्न आहेत. त्याची चिंता लोकांना आहे. दहा वर्षात मोदी यांच्या हातात सत्ता आहे. मत मांडायचा त्यांना अधिकार आहे. पण ते सत्यावर आधारित असले पाहिजे. पण तसे किती दिसत आहे याचा विचार केला पाहिजे. 


मोदींनी आपला शब्द पाळला नाही


महागाई किती वाढली आहे. मला सत्ता द्या असे त्यांनी दहा वर्षापूर्वी सांगितले होते. पन्नास दिवसात महागाई कमी करणार असल्याचं सांगितलं होते. मात्र दहा वर्षात महागाई कमी नाही वाढली दिसत आहे. मोदींनी आपला शब्द पाळला नाही. गॅस सिलेंडर कमी करणार असल्याचं सांगितलं होते. आज मात्र 1160 रुपये भाव आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 


मोदी साहेब केवळ घोषणाच करतात


दोन कोटी रोजगार देणार असल्याच सांगत होते. आज काय परिस्थिती आहे. रोजगाराचा प्रश्न गंभीर आहे. दोन कोटीची केवळ घोषणा होती. मोदी साहेब केवळ घोषणाच करतात. सत्ता देशाच्या हितासाठी असायला पाहिजे.  केजरीवाल यांनी त्यांच्यावर टीका केली तर त्यांना जेलमध्ये टाकले. सत्ता या साठी वापरायची असते का? राहुल गांधी आणि त्यांच्या परिवाराने या देशासाठी त्याग केला आहे, सेवा केली आहे. तुम्ही त्यांच्यावर टीका करत आहात. 


मोदी टीका टिप्पणी करून आपल्या पदाची गरिमा कमी करताय


इंदिरा गांधी यांनीही देशासाठी काम केलं, योगदान दिले. त्याचा अभिमान असायला पाहिजे मात्र हे त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न करत आहेत. पंतप्रधान मोदी आमच्यावरही टीका करत आहेत. मोदी साहेब केवळ टीका टिप्पणी करून आपल्या पदाची गरिमा कमी करत आहेत. दिल्लीत शेतकऱ्यांनी आंदोलन केले. मात्र मोदी यांना त्यांचे प्रश्न काय आहे? हे समजून घ्यावे, असे वाटले नाही.  म्हणून आज शेतीची ही अवस्था झाली आहे.


आणखी वाचा 


Sharad Pawar: नरेंद्र मोदी देशासमोर संकट, असा असत्य बोलणारा पंतप्रधान मी कधी पाहिला नाही; शरद पवारांचा प्रहार