कोल्हापूर :  पंतप्रधान मोदींनी (PM Modi)  इंडिया आघाडी प्रत्येक वर्षी एक पंतप्रधान देईल या वक्तव्यावर  शरद पवारांनी (Sharad Pawar)  चांगली सडकून टीका केली आहे. एवढं अवास्तवात आणि असत्य बोलणारे पंतप्रधान मी कधी पाहिलेला नाही.  इंडिया आघाडीचं सरकार आल्यास पाच  वर्षात पाच पंतप्रधान आणणार हा जावईशोध पंतप्रधानांनी कुठून लावला? पंतप्रधान पदाची अप्रतिष्ठा या आधी कधी पाहिले नाही, असे म्हणत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.  तसेच नरेंद्र मोदी हे देशातील पुढचं संकट वाटतं, देखील शरद पवार म्हणाले. ते कोल्हापुरात बोलत होते.


शरद पवार म्हणाले,  निवडणूक झाल्यानंतर इंडिया आघाडीला बहुमत मिळाल्यानंतर पूर्ण सरकार देण्याची आमची तयारी. त्यांच्या डोक्यात जे आहे ते आमच्या डोक्यात नाही. सरकार आल्यानंतर आम्ही पाच पंतप्रधान देणार यावर  आमच्या आघाडीत काही चर्चा झाली नाही. पंतप्रधानपदाबाबत आज चिंता करण्याची गरज नाही. पुरेसे संख्याबळ आल्यावर नेत्याची निवड केली जाईल. त्याला पूर्ण सहकार्य देत स्थिर सरकार देत अखंड पाच वर्ष चालवलं जाईल. त्यामुळे पाच वर्ष पाच  पंतप्रधान ही कल्पना मोदींच्या डोक्यातून आली. आमच्या डोक्यात नाही असं त्यांनी म्हटलं.


मोदींच्या भाषणातील पहिले तीन-चार वाक्य स्थानिक नेत्यांनी लिहून दिलेली असतात: शरद पवार


लोकांचे समाधान करण्याची खात्री मोदींना नाही.  त्यामुळे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला जातो. मोदींच्या भाषणाची एक स्टाईल आहे.त्या ठिकाणी स्थानिक नेते लिहून देतात ते आणि तेच म्हणतात. कराडमध्ये जाऊन यशवंतराव चव्हाण आणि कराडचा उल्लेख नाही. दक्षिणेकडील राज्यात मोदी यांना प्रतिसाद मिळत नाही त्यामुळे देश तोडायला सुरुवात केली अशी टीका करतात. मोदीकडे लोकांचा समाधान करण्याचे मुद्दे नाहीत, त्या मुळे ते भरकटवत आहेत. मोदींचे भाषणातील पाहिले तीन-चार  वाक्य असतात ती कोणीतरी लिहून दिलेली असतात. स्थानिक मुद्द्यांवरुन भाषण सुरू करणं ही मोदी स्टाईल आहे. देशाच्या पंतप्रधानांना सर्व राज्य सारखी असतात असं बोलायचं नसतं, असेही शरद पवार म्हणाले.  


मोदींना गतवर्षी पेक्षा कमी जागा महाराष्ट्रात मिळतील : शरद पवार 


शरद पवार म्हणाले,  आतापर्यंत झालेलं मतदान काळजी करण्यासारखं आहे. त्याचं कारण कडक ऊन आहे. विशिष्ट वर्गातील नागरिकांनी उन्हात मतदानाला जाणं टाळलं, याची सर्व पक्षांनी दखल घेतली, त्यामुळे इथून पुढे चांगलं मतदान होईल असं दिसतंय. मताची टक्केवारी वाढेल अशी आशा आहे. महाराष्ट्रात आम्हाला गेल्या वेळी पेक्षा चांगला प्रतिसाद आम्हाला मिळेल मोदी यांना गतवर्षी पेक्षा कमी जागा महाराष्ट्रात मिळतील.  


गडकरींसारखा उमेदवार असूनही नागपुरात मतदान कमी : शरद पवार


निवडणूक आयोगाने उशीरा  जाहीर केलेल्या मतदानाच्या आकडेवारीवर बोलताना शरद पवार म्हणाले, मतदानाची टक्केवारी उशिरा जाहीर केली त्यावर आमची तक्रार आहेच. महाराष्ट्रात इतक्या टप्प्यात मतदान घ्यायची गरज काय होती. इतर राज्यात एका-एका टप्प्यात निवडणूक घेता. चंद्रपूर आणि नागपूरपेक्षा गडचिरोलीला जास्त मतदान हे शंका घेण्यासारखं आहे.  नागपूरमध्ये नितीन गडकरी असताना देखील नागपूरमध्ये कमी मतदान झाले आहे. कमी मतदान ही चिंतेची बाब आहे, असे शरद पवार म्हणाले. 


सत्तेचा गैरवापर सुरू आहे याचे उत्तम उदाहरण शशिकांत शिंदे : शरद पवार


सत्ताधारी पक्ष सत्तेचा कसा गैरवापर करतो हे अनेक वेळा दिसून आलं आहे अनेक नेत्यांना अटक केली आहे. तीच स्थिती सातारा जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. शशिकांत शिंदे यांच्या बाबतीत तेच दिसत आहे. कृषी समितीच्या संबंधीत की केस आहे. काहींना काही त्रुटी काढून त्रास देण्याचं काम सुरू आहे. सत्तेचा गैरवापर सुरू आहे त्याच उदाहरण आहे, असेही शरद पवार म्हणाले.


Sharad Pawar Video: