Jalgaon News : जळगावमध्ये शरद पवार गटाला धक्का, खंदा शिलेदार भाजपात, गिरीश महाजनांना असलेला विरोध मावळला

Jalgaon : गेल्या 35 वर्षांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजप नेते गिरीश महाजन यांच्या विरोधात राजकारण करणारा नेता भाजपात सहभागी होणार आहे.

Continues below advertisement

Jalgaon News :  आगामी निवडणुकांच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला (NCP Sharad Pawar Group) धक्का बसला आहे. मागील 35 वर्षांपासून विद्यमान मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या विरोधात राजकारण करणारा शरद पवारांचा शिलेदार भाजपात दाखल झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे संजय गरुड (Sanjay Garud) यांनी पक्ष सभासदत्वाचा राजीनामा देत भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जिल्ह्यात चर्चांना उधाण आले असून राजकीय समीकरणेही काही प्रमाणात बदलणार आहेत. 

Continues below advertisement

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी गावचे संजय गरुड हे गेल्या 35 वर्षांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजप नेते गिरीश महाजन यांच्या विरोधात लढत आले आहेत. त्यांनी महाजनांविरोधात चार वेळा विधानसभा निवडणूक लढवली. मात्र, त्यांना एकदाही यश मिळाले नाही. त्यात गेल्या काही दिवसापासून त्यांच्या पक्षातूनच कुरघोडीच्या राजकारणाला सामोरे जावे लागत होते. त्याशिवाय, विरोधी बाकांवर असल्याने त्यांच्या कार्यकर्त्याची कामे होत नसल्याने संजय गरूड त्रस्त होते. अशातच अयोध्या राम मंदिर सोहळ्याच्या मिरवणुकीत काही वेळेसाठी सहभागी झालेल्या संजय गरुड यांना मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपामध्ये येण्याचा सल्ला दिला.मंत्री गिरीश महाजन यांच्या सल्ल्यानंतरचा मागचा पुढचा विचार न करता संजय गरुड यांनी आपल्या  राष्ट्रवादी पक्षाचा सदस्यत्वाचा राजीनामा पक्ष श्रेष्ठी यांच्याकडे सुपूर्द केला आहे.

मुंबई होणार पक्षप्रवेश 

संजय गरूड यांचा मंगळवारी मुंबईत  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, राज्याचे मंत्री गिरीश महाजन आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश होणार आहे.  संजय गरूड यांच्या भाजपा प्रवेशानंतर मंत्री गिरीश महाजन यांची त्यांच्या जामनेर मतदार संघात  ताकद अजून वाढणार  आहे. राजकीय क्षेत्रात भक्कम विरोधी नेता राहिला नसल्याने चर्चेचा विषय बनला आहे.

काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले उल्हास पाटील लेकीसह भाजपामध्ये 

 काँग्रेस (Congress)  पक्षातून निलंबित करण्यात आलेले माजी खासदार डॉ. उल्हास पाटील (Ulhas Patil) यांनी  कन्या डॉ. केतकी पाटीलसह (Ketaki Patil) भाजपामध्ये (BJP)  प्रवेश करणार आहे. डॉ. उल्हास पाटील हे 1998 साली काँग्रेस पक्षाकडून निवडून आले होते. मात्र केवळ तेरा महिन्याचा काळ त्यांना मिळाला होता.एके काळी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व असलेल्या जळगाव जिल्हयात काँग्रेस पक्षाला पुन्हा गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी डॉ.  उल्हास पाटील यांनी प्रयत्न केले मात्र त्यात त्यांना यश मिळाले नाही. काँग्रेसचे माजी खासदार डॉ.  उल्हास पाटील हे काँग्रेसमध्ये राहिले असेल तरी  यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील या काँग्रेसमध्ये कधीच दिसल्या नव्हत्या.  त्या भाजपामध्ये जाणार असल्याच्या चर्चा माध्यमातून येऊ लागल्याने काँग्रेस पक्षातून डॉ. उल्हास पाटील यांना अचानक निलंबित करण्यात आले आहे. 

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola