जळगाव : नव्याने बसवलेल्या लिफ्टची टेस्टिंग केली जात असताना अचानक लिफ्टचा वायर रोप तुटून लिफ्ट कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत  एकाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीररित्या जखमी झाला आहे. ही घटना जळगाव (jalgaon) शहरात नविपेथ भागात घडली आहे.


जळगाव शहरातील नवी पेठ भागात तीन मजली इमारतीत बसवलेल्या लिफ्टची टेस्टिंग करत असताना, अचानकरित्या लिफ्टचा वायर रोप तुटून लिफ्ट खाली कोसळली आहे. या घटनेत सायकल व्यावसायिकाचा मृत्यू झाला आहे. राजकुमार दर्डा असे व्यावसायिकाचे नाव आहे. सायकल व्यवसाया करत असलेल्या तीन मजली इमारतीत राजकुमार दर्डा यांच्याकडून लिफ्ट बसवण्याचे काम सुरु होते. यावेळी लिफ्ट बसवून झाल्यानंतर लिफ्टची टेस्टिंग सुरु असतानाच, अचानक लिफ्टची वायररोप तुटून तिसऱ्या मजल्यावरुन ही लिफ्ट खाली कोसळली. यात राजकुमार दर्डा हे गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान या घटनेप्रकरणी जळगाव शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


महत्वाच्या बातम्या:


Jalgaon Train Accident: जळगाव रेल्वे दुर्घटनेत जीव गेला, मृतदेह नेपाळला कसे न्यायचे? संकटमोचक गिरीश महाजन मदतीला धावले!