Rohini khadse मुंबई : अजित पवार गटाचा सोशल मीडिया मेळावा काल पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) कार्यकर्त्यांना विविध सूचना दिल्या. महिलांवर टीका करायची नाही, अशी तंबी देखील अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिली दिली. अजित पवार एक उदाहरण देत म्हणाले की, स. का. पाटलांचा प्रचार करताना 'पापापा' असे लिहून प्रचार केला जात होता. 


पापापा म्हणजेच पाटलाला पाडलं पाहिजे, आता 'काकाका' असे लिहून प्रचार केला पाहिजे, असे अजित पवारांनी म्हटले आहे. त्यामुळे आता अजित पवार यांनी थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनाच (Sharad Pawar) आव्हान देण्यास सुरुवात केली आहे. यावरून आता अजित पवारांवर शरद पवार गटाच्या नेत्यांकडून जोरदार टीका केली जात आहे.


आमचा पक्ष आणि चिन्ह शरद पवार


राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी अजित पवारांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. रोहिणी खडसे म्हणाल्या की, आम्ही विभागवार महिला मेळावे घेत आहोत. आज शरद पवार यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी हा मेळावा घेण्यात येत आहे. आमचा पक्ष गेला, चिन्ह गेले, परंतु आमचा पक्ष आणि चिन्ह शरद पवार हेच आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. 


म्हणून काकाच हवेत


अजित पवार यांच्या काकाका वक्तव्यावरून रोहिणी खडसे (Rohini Khadse) म्हणाल्या की, महिला धोरण लागू कोणी केलं? काकांनी केलं. राजकारणात खांद्याला खांदा लावून महिला आज कुणामुळे काम करत आहेत? काकांमुळे करत आहेत. महिला आयोगाची स्थापना कोणी केली? काकांनी केली. संरक्षण दलात महिला कोणामुळे काम करत आहेत, काकांमुळे करत आहेत. म्हणून काकाच हवे आहेत, असे प्रत्युत्तर त्यांनी अजित पवारांना दिले आहे. 


काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?


जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले, कारण पुतण्या गद्दार निघाला. वेळ अशी येईल की वेळ येईल विचारण्याची काका का असे करता माफ करा चुकी झाली आणि ह्या वेळेस 2019 सारखी माफी नाही .गद्दारांना माफी नाही ! असे जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांच्या विधानाची 'एबीपी माझा'ने दिलेली बातमी शेअर करून प्रत्युतर दिले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या