Raksha Khadse : मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावात संत मुक्ताई यात्रेमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे (Raksha Khadse) यांच्या मुलीसह काही मुलींची टवाळखोरांनी छेडछाड केल्याचा संतापजनक प्रकार घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या छेडछाड प्रकरणात सात पैकी तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यामुळे अनुज पाटील, अनिकेत भोई, किरण माळी यांचा समावेश आहे. आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली असून रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड करणाऱ्या आरोपींमध्ये भाजपचाच (BJP) माजी नगरसेवक असून तो सध्या शिवसेना शिंदे गटात (Shiv Sena Shinde Faction) आहे. 

Continues below advertisement

आरोपींमध्ये समावेश असलेला अनिकेत भोई हा शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय असलेल्या उपजिल्हाप्रमुख छोटू भोई यांचा पुतण्या आहे. त्याच्यावर यापूर्वी गुंडगिरी, हाणामारी करून गंभीर दुखापत करणे, यासारखे चार गुन्हे मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात दाखल आहेत. 

आरोपींमध्ये भाजपचाच माजी नगरसेवक

तर पीयूष मोरे हा पूर्वीचा भाजपाचा माजी नगरसेवक राहिलेला असून काही दिवसांपूर्वी तो आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटात सहभागी झाला आहे. तो सध्या कोणत्याही पदावर कार्यरत नाही. तर सचिन पालवे हा  शिंदे गटातील युवा शहर प्रमुख म्हणून सध्या कार्यरत आहे. या प्रकरणातील बहुतांश आरोपी हे शिवसेना शिंदे गटात पदावर नसले तरी ते शिंदे गटाचे कार्यकर्ते असल्याची माहिती समोर येत आहे. 

Continues below advertisement

नेमकं प्रकरण काय? 

मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावात महाशिवरात्री निमित्त आदिशक्ती मुक्ताबाईची यात्रा भरते. या यात्रेनिमित्त कोथळी विविध कार्यक्रम पार पडतात. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची कन्या या यात्रेत फराळ वाटप करत होती. यावेळी भोई नावाचा तरुण तिचा पाठलाग करत होता. त्यानंतर रक्षा खडसे यांची कन्या यात्रेमध्ये सायंकाळच्या वेळेस मैत्रिणीबरोबर फिरायला गेली असता भोई नावाच्या तरुणासह काही टवाळखोरांनी तिचा पाठलाग केला. ती ज्या पाळण्यामध्ये बसत होती, त्या पाळण्यामध्ये सुद्धा तरुण बसला. त्यानंतर काही व्हिडिओ चित्रित केले. ही बाब सुरक्षा रक्षकाच्या लक्षात येताच त्यांनी त्याला मज्जाव केला. परंतु टवाळखोरांनी सुरक्षारक्षकाशी झटापट केली. टवाळखोरांना तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी रक्षा खडसे आक्रमक झाल्या होत्या. यानंतर या प्रकरणात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी (Police) सात पैकी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. तर इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. अनुज पाटील, अनिकेत भोई, किरण माळी, अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या टवाळखोरांची नावे आहेत. 

आणखी वाचा 

Rohini Khadse : महिला सुरक्षेसाठी गृहखातं अपयशी, पोलीस यंत्रणा कुठल्या दबावाखाली? भाचीच्या छेडछाडीवरून रोहिणी खडसे संतापल्या