Jalgaon: केंद्रीय मंत्री रक्षा खडसे (Raksha Khadse) यांच्या मुलीसह काही मुलींची मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावात संत मुक्ताई यात्रेमध्ये टवाळखुरांनी छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने मोठी खळबळ उडाली .एका केंद्रीय मंत्र्याची मुलगी सुरक्षित नसेल तर सर्वसामान्य मुलीचे काय असा सवाल केला जातोय .या प्रकरणात राजकीय पक्षांचा सहभाग असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर आता या प्रकरणात छेडछाड करणाऱ्या तिघांना अटक करण्यात पोलिसांना यश मिळालं आहे .यामध्ये मुख्य आरोपी अनिकेत भोई याचा समावेश आहे .एक अल्पवयीन मुलगा ही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आला आहे . (Muktainagar)

Continues below advertisement

दरम्यान या प्रकरणात काही दिवसांपूर्वी अनिकेत भोई पियुष मोरे सोम माळी अनुज पाटील आणि किरण माळी या 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता .यातील मुख्य आरोपी अनिकेत भोई एका पक्षाच्या कार्यकर्त्याचा नातेवाईक असल्याची माहिती पुढे आली होती .

मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर मोठी कारवाई

मुक्ताईनगरच्या कोथळी गावात संत मुक्ताई यात्रेत केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह काही मुलींचे टवाळखुरांनी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला .या प्रकरणावरून विरोधकांनी जोरदार आवाज उठवत लक्ष वेधलं . यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी कडक कारवाईचा इशारा दिला .मुलींची छेडछाड करणाऱ्या मागे काही विशिष्ट पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी असून त्यांनी हे अतिशय वाईट प्रकारचे काम केलं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. छेडछाड करणाऱ्या कुणालाही सोडणार नाही असा तीव्र इशारा दिल्यानंतर मुक्ताईनगर पोलिसांनी छेडछाड करणाऱ्या तिघांना अटक केली आहे .

Continues below advertisement

मुक्ताईनगर यात्रेत रक्षा खडसेंच्या मुलीसह इतर मुलींची छेडछाड

मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावात महाशिवरात्री निमित्त आदिशक्ती मुक्ताबाईची यात्रा भरते. या यात्रेनिमित्त कोथळी विविध कार्यक्रम पार पडतात. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची कन्या या यात्रेत फराळ वाटप करत होती. यावेळी भोई नावाचा तरुण तिचा पाठलाग करत होता. त्यानंतर रक्षा खडसे यांची कन्या यात्रेमध्ये सायंकाळच्या वेळेस मैत्रिणीबरोबर फिरायला गेली असता भोई नावाच्या तरुणासह काही टवाळखोरांनी तिचा पाठलाग केला. ती ज्या पाळण्यामध्ये बसत होती, त्या पाळण्यामध्ये सुद्धा तरुण बसला. त्यानंतर काही व्हिडिओ चित्रित केले. ही बाब सुरक्षा रक्षकाच्या लक्षात येताच त्यांनी त्याला मज्जाव केला. परंतु टवाळखोरांनी सुरक्षारक्षकाशी झटापट केली. टवाळखोरांना तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी रक्षा खडसे आक्रमक झाल्या होत्या. यानंतर आता या प्रकरणात पाच जणांविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी (Police) एकाला ताब्यात घेतले होते. तर इतर आरोपींचा पोलीस शोध घेत होते.  

 

हेही वाचा:

Pune Crime Swargate bus depot: काय करायचंय ते कर पण मला जिवंत सोड, तरुणी घाबरल्याने दत्तात्रय गाडेचा आत्मविश्वास वाढला, दुसऱ्यांदा शरीराचे लचके तोडले