Gulabrao Patil : मन खिन्न करणारी घटना असून देशाने आणि महाराष्ट्राने काहीतरी शिकावं, अशी ही घटना आहे. जेवढा निषेध करता येईल तो फार कमी आहे. तालुका जिल्हा आणि महाराष्ट्राने (Maharashtra) या घटनेची मोठी धास्ती घेतली असून कुठेही काहीही घडू शकत, असे या घटनेमुळे समोर आले आहे. सात ते आठ दिवसात पोलीस न्यायालयात चार्जशीट दाखल करतील. तसेच एक ते दीड महिन्याच्या आत या खटल्याचा निकाल लागेल, अशी ग्वाही मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी पीडित कुटुंबीयांना तसेच ग्रामस्थांना दिले आहे.
राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री तसेच जळगाव (Jalgaon) जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज भडगाव (bhadgaon) तालुक्यातील गोंडगाव येथे जाऊन पीडित मुलीच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी त्यांनी कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांचे सांत्वन केले. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, अतिशय संताप आणणारी घटना असून देशाने महाराष्ट्राने काहीतरी शिकावं, अशी ही घटना आहे. जेवढा निषेध करता येईल तो फार कमी आहे. तालुका जिल्हा आणि महाराष्ट्राने या घटनेची मोठी धास्ती घेतली असून कुठेही काहीही घडू शकत, असे या घटनेमुळे समोर आले आहे. सात ते आठ दिवसात पोलिसांकडून न्यायालयात चार्जजिट दाखल करण्यात येईल तसेच एक ते दीड महिन्याच्या आत या खटल्याचा निकाल लागणार असल्याची पोलीस अधीक्षकांसोबत चर्चा झाली आहे.
ते पुढे म्हणाले की, अपंगाच्या मुलीवर एक राक्षसी प्रवृत्तीचा माणूस अत्याचार करतो, त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आरोपीला जास्तीत जास्त कठोरात कठोर शिक्षा होईल, यासाठी मी मंत्री म्हणून, आमदार किशोर पाटील असतील, पाठपुरावा करत असून सरकार म्हणून आम्ही सर्व पीडित कुटुंबियांच्या पाठीशी आहोत.आरोपीच्या गावातील घर निष्काशीत करण्याबाबतही मंत्री गुलाबराव पाटील यांचे गावकऱ्यांनी भेट घेतली. त्यावर पोलिस अधीक्षकांना सूचना देण्यात आल्या आहेत. कायद्यात जर ते बसत असेल तर ते घर निष्कासित करण्यात येईल, असा इशारा देखील गुलाबराव पाटील यांनी दिला.
परिवाराला न्याय मिळणारच....
पीडित मुलीच्या कुटुंबियांचं पुनर्वसन करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, मात्र सर्वात आधी जी चुकीची घटना घडली आहे, त्या घटनेतून परिवाराला न्याय कसा मिळेल, याचा प्राधान्याने विचार केला जात आहे, असे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. तर कालच राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील तसेच शिवसेना शिंदे गटाचे पाचोरा भडगाव तालुक्याचे आमदार किशोर पाटील, माजी आमदार दिलीप वाघ यासह राजकीय नेत्यांनी कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलं. तसेच यावेळी आमदार किशोर पाटील यांनीही त्यांच्याकडून वैयक्तिक 50 हजाराची मदतीच्या कुटुंबीयांना केली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :