Jalgaon News : जळगावमधील (Jalgaon) दोन कलाकारांनी अहिराणी गाण्यांच्या (Ahirani songs) माध्यमातून सोशल मीडियावर कोट्यवधी चाहत्यांना भुरळ घातली आहे. सचिन कुमावत (Sachin Kumavat) आणि पुष्पा ठाकूर (Pushpa Thakur) अशी अहिराणी गीत कलाकाराची नावे आहेत. या दोन्ही कलाकारांनी सोशल मीडियावर बॉलिवूड कलाकारांएढीच प्रसिद्धी मिळवल्याचे पाहायला मिळत आहे.


जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी गावातील कलाकार सचिन कुमावत यांना लहानपाणापासून सिने इंडस्ट्रीजमध्ये काम करण्याचं स्वप्न उराशी बाळगलं होतं. मात्र, गरीब वस्तीत राहणाऱ्या सचिन यांना मुंबई सिने इंडस्ट्रीमध्ये साधं ऑडिशन देण्याचीही संधी मिळू शकली नाही. मात्र, यावर खचून न जाता सचिन कुमावत यांनी आपल्या गावातील तरुणांना हाताशी घेत, गावातील विषयावर अहिराणी गाण्याचे अल्बम काढण्यास सुरुवात केली. गेल्या पाच वर्षापूर्वी त्याने ही सुरुवात केली होती. गावातील विविध विषयाची अहिराणी गाणी, त्यात गावातील कलाकार आणि कोणालाही लगेच आवडेल अशा ठेक्यावर केलेला नाच. याचा एकत्रित परिणाम म्हणून सचिन कुमावत आणि त्याची सहकारी कलाकार पुष्पा ठाकूर हिला चाहत्यांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्याचं चित्र पहायला मिळत आहे.


मायबोली भाषेला मोठी करण्याचा निर्णय


सचिन आणि पुष्पा यांनी काम केलेल्या गाण्यांना एखाद्या सिने कलाकारा एवढीच पसंती चाहत्यांनी दिली आहे. लाखो नाही तर कोट्यवधी चाहत्यांनी त्यांना सोशल मीडियावर फॉलो केलं आहे.
सिने इंडस्ट्रीमध्ये हिंदी गाणे चालत असले तरी खानदेशची मायबोली भाषा अहिराणी भाषेला मोठी करण्याच्या हेतूने सचिन आणि पुष्पा ठाकूर यांनी अहिराणी गाण्यावरच काम करायचं ठरवलं आहे.


 सेल्फी काढण्यासाठी हजारो फॅन्सची गर्दी  


अहिराणी भाषेतील अल्बमला लोक एवढं डोक्यावर घेतील अस स्वप्नातही वाटल नव्हतं. मात्र रसिकांनी ज्या पद्धतीने आम्हाला पसंती दिली त्याबद्दल त्यांचे नेहमीच ऋणी राहू असे सचिन यांनी सांगितले. येणाऱ्या काळात नवं नवीन प्रकाराची गाणी देऊन रसिकांना आनंद देऊ असंही सचिन आणि पुष्पा यांनी म्हटलं आहे. अहिराणी भाषेतील गाण्यावर नाच गाणे करून विविध कार्यक्रम आणि सोशल मीडियावर गाजलेल्या या जोडीला पाहण्यासाठी आणि त्यांच्या सोबत सेल्फी काढण्यासाठी हजारो फॅन गर्दी करत आहेत. ही गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त लावण्याची वेळ येत असते.


कुठे कुठे बोलली जाते अहिराणी भाषा


खानदेशी (अहिराणी) ही खानदेश प्रदेशातील बोलली जाणारी भाषा आहे. जळगाव, धुळे आणि नंदुरबार हे तीन जिल्हे, औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्याचा काही भाग आणि नाशिक जिल्ह्याच्या कळवण, सटाणा, मालेगाव व देवळा या तालुक्यांत ती बोलली जाते. या भूप्रदेशातील लोक अहिराणी बोलत असले, तरीही वाचन आणि लेखन यांसाठी प्रमाण मराठीचा वापरण्याचा कल आढळतो. खानदेशीत दोन बोलीभाषा आहेत एक अहिराणी आणि दुसरी डांगरी.


महत्वाच्या बातम्या:


खान्देशातील आखाजी सण : अहिराणी गाण्यांचा गोडवा, खापरावरच्या पुरणपोळ्यांचा बेत, माहेरवाशिणींचा मुक्त झोके घेण्याचा दिवस