जळगाव : शारदीय नवरात्री उत्सवाचा उत्साह सगळीकडे असताना जळगावमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. देवीची मूर्ती आणण्यासाठी गेलेल्या वाहनाचा अपघात (Jalgaon Accident) झाला आणि त्यावेळी ती मूर्ती अंगावर पडल्याने एका तरूणाला आपला जीव गमवावा लागला आहे. संजय उर्फ जितू गोपाल कोळी (वय 35 रा. जोशी वाडा, मेहरूण) असे मयत तरुणाचे नाव आहे. संजयच्या मृत्यूनंतर या परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.  


शहरातील मेहरूण भागातील जोशी वाडा परिसरात नवरात्रोत्सवानिमित्त देवीची मूर्ती आणण्यासाठी काही तरुण बऱ्हाणपूर येथे गेले होते. तेथून परतत असताना मुक्ताईनगर तालुक्यातील पुरणाड फाट्याजवळ त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. त्या अपघातात देवीची मूर्ती अंगावर पडून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी पहाटे 12.15 च्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


कॉलनीत नवरात्र उत्सवानिमित्त देवी बसवण्यासाठी तयारी झालेली होती. त्याकरता देवीची मूर्ती बऱ्हाणपूर येथून आणण्यासाठी मंडळाचे काही कार्यकर्ते हे शनिवारी गेलेले होते. तेथून परतत असताना रात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास पुरणाड फाट्यावर वाहनाचा अपघात झाला. या अपघातामध्ये देवीची मूर्ती जितू उर्फ संजय कोळी यांच्या अंगावर पडली. त्याच्याखाली दाबला गेल्याने संजय कोळी हा गंभीर जखमी झाला होता.


संजयच्या मित्रांनी तात्काळ त्याला उपजिल्हा रुग्णालय, मुक्ताईनगर या ठिकाणी उपचारासाठी दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मयत घोषित केले.  मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


फरार असलेल्या चोरट्याला अटक


विरार पोलिसांच्या तावडीतून पळालेला कुख्यात चोर मंगेश पार्टे याला अखेर आठ दिवसांनी पकडण्यात गुन्हे शाखा 3 च्या पथकाला यश आले आहे. विशेष म्हणजे फरार असतानाही या आरोपीने 3 ठिकाणी चोरी केली होती. त्याला यापूर्वी सख्या भावाच्या हत्या प्रकरणातही अटक करण्यात आली होती.


मंगेश उर्फ मनिष यशवंत पार्टे (48) हा सराईत चोर आहे. ट्रेनमध्ये, मंदिरातून तसेच बाजारातून तो लोकांच्या बॅंग चोरण्यात माहीर (Virar Bag Thief)आहे. 3 ऑक्टोबर रोजी त्याला विरार पोलिसांनी अंबेमाता मंदिरात बॅग चोरी करण्याच्या प्रकरणात अटक केली होती. 5 ऑक्टोबर रोजी त्याला वैद्यकीय तपासणीसाठी वसई विरार महापालिकेच्या चंदनसार येथील जीवदानी रुग्णालयात तपासणीसाठी आणले असताना बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांच्या हातातवर तुरी देऊन तो फरार झाला होता. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेते होते. अखेर गुन्हे शाखा 3 च्या पथकाने सीसीटीव्हीच्या आधारे माग काढून त्याला शनिवारी रात्री अटक केली आहे.


ही बातमी वाचा: