जळगाव : "गेले काही मी दिवस गप्प होतो, मी मंत्री होऊ नये म्हणून  काही जणांनी देवाजवळ नारळ बुडून ठेवले होते. पण मी तिसऱ्यांदा मंत्री झालो. मिरवणुकीत हजार गाड्या होत्या, पैसा कितीही असला तरी बाजारात माणूस विकत घेता येत नाही, 35 वर्षांची माझी ही तपश्चर्या आहे.  माझ्याकडे जातीचे भांडवल नाही, माझी जात तुम्हीच आहात. बरेच दिवस माझ्यावर बऱ्याच टीका केल्या, पण मी गप्प होतो. वरपर्यंत निरोप गेले मंत्री करू नका म्हणून, तक्रार करणारे जळगावातील होते. परंतु, मी जर माझा तिसरा डोळा उघडला तर काय करू शकतो हे त्यांना माहीत नाही, असा इशारा शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांनी दिला. 


मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आज पहिल्यांदाच आमदार गुलाबराव पाटील हे जळगाव जिल्ह्यात दाखल झाले. जिल्हावासियांनी यावेळी त्यांचं जंगी स्वागत केलं. अमळनेर तालुक्यातील कोंढवाय फाट्यावर फटाके फोडून गुलाबराव पाटील यांचं जल्लोष स्वागत करण्यात आलं. भर पावसात देखील शेकडो कार्यकर्ते गुलबाराव पाटील यांच्या मिरवणूक रॅलीत सहभागी झाले होते. गुलाबराव पाटील यांच्या या मिरवणुकीत जवळपास तीनशे कार सहभागी झाल्या होत्या. मिरवणुकीनंतर पाटील यांनी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. 


गुलाबराव पाटील म्हणाले,"खातेवाटपाबाबत कल्पना नाही. आमच्या पक्षात  कोणतीही नाराजी नाही, प्रत्येकाला वाटत असतं की, आपल्याला चांगले खाते मिळावे आणि साहजिक तो प्रत्येकाचा अधिकार आहे. शिवसेना भवन दादर आणि ठाण्यात उभारले जाणार आहे आणि तिथे कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, जनतेच्या समस्या ऐकल्या जाणार. पक्ष कार्यालय तिथे उभे राहणार. मार्मिक कार्यक्रमात उद्धव ठाकरे जे काही शिवसेनेबाबत बोलले त्याबाबत मी त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही. संजय क्षीरसाठ यांनी ते ट्विट काढले,  शेवटी माणूस आहे काही गोष्टी त्यांना वाटल्या असतील. उद्यापासून आम्ही आमच्या कामकाजावर जाणार, शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्यापेक्षा तलाठी आणि प्राथमिक पंचनामे बघणार. 
 
"आजची रॅली बघितल्यानंतर मला थकवा आला नाही. ज्या गावात मी गुलाबचा गुलाबराव झालो त्या गावात मला यावेच लागले. धरणगावात गुलाबराव काही नाही असे काही जण म्हणायचे. पण आज त्यांनी बघितले, माझ्याविरोधात कोण षडयंत्र रचते ते मला माहित आहे, पण मी लक्ष देत नाही. येत्या एक दोन दिवसात खातेवाटपात होईल. कोणतेही खाते आले तरी काम करण्याची धमक पाहिजे,  असे गुलाबराव पाटील म्हणाले. 
 
जळगावात जंगी स्वागत
गुलाबराव पाटील यांचे जळगावातील धरणगावात फटाक्यांची आतिषबाजी आणि जेसीबीवरून पुष्पवृष्टी करून जंगी स्वागत करण्यात आले.  यावेळी जात, गोत्र अन धर्म अमुचा शिवसेना या  गाण्याच्या तालावर गुलाबरावांचे ठिकठिकाणी स्वागत केले जाते होते.  गुलाबराव पाटील यांची कोंढवळ ते पाळधीपर्यंत 60 किलो मीटरपर्यंतची भव्य कार रॅली काढण्यात आली. या कार रॅलीत शेकडो कार घेऊन कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यामुळे दूरपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा दिसत होत्या. गुलाबराव पाटील देखील कारचं टप उघडून लोकांना हात दाखवून त्यांना अभिवादन करत होते.   


महत्वाच्या बातम्या


PHOTO : मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर जळगावात गुलाबराव पाटलांचं जंगी स्वागत