PHOTO : मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर जळगावात गुलाबराव पाटलांचं जंगी स्वागत
मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटील हे जळगाव जिल्ह्यात आज दाखल झाले. जिल्हावासियांनी यावेळी त्यांचं जंगी स्वागत केलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअमळनेर तालुक्यातील कोंढवाय फाट्यावर फटाके फोडून गुलाबराव पाटील यांचं जल्लोष स्वागत करण्यात आलं.
भर पावसात देखील शेकडो कार्यकर्ते गुलबाराव पाटील यांच्या मिरवणूक रॅलीत सहभागी झाले होते. गुलाबराव पाटील यांच्या या मिरवणुकीत जवळपास तीनशे कार सहभागी झाल्या होत्या.
यावेळी जात, गोत्र अन धर्म अमुचा शिवसेना या गाण्याच्या तालावर गुलाबरावांचे ठिकठिकाणी स्वागत केले जाते होते.
जळगावातील धरणगावात फटाक्यांची आतिषबाजी आणि जेसीबीवरून पुष्पवृष्टी करून गुलाबराव पाटील यांचे स्वागत करण्यात आले.
गुलाबराव पाटील यांची कोंढवळ ते पाळधीपर्यंत 60 किलो मीटरपर्यंतची भव्य कार रॅली काढण्यात आली.
या कार रॅलीत शेकडो कार घेऊन कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यामुळे दूरपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा दिसत होत्या.
गुलाबराव पाटील देखील कारचं टप उघडून लोकांना हात दाखवून त्यांना अभिवादन करत होते.