Jalgaon Agriculture News : केळीने (banana) भरलेली मालगाडी तब्बल 12 तासानंतर स्टेशनहून रवाना झाली. चालक उपलब्ध नसल्यानं 12 तास ही मालगाडी जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील सावदा रेल्वे स्टेशनवर (Savda Railway Station) उभी होती. रात्री एक वाजण्याच्या सुमारास ही गाडी दिल्लीकडे रवाना झाली. जळगाव ते दिल्ली अशी शेत मालाची वाहतूक या गाडीतून केली जाते. यावरुन शेतकरी मात्र, चांगलेच आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांनी रेल्वे प्रशासना विरोधात रोष व्यक्त करत थेट रेल्वे मंत्रालयातच या घटनेची माहिती दिली आहे. दरम्यान, मध्यरात्री एक वाजता चालक उपलब्ध झाल्यानंतर गाडी दिल्लीकडे रवाना झाली आहे.


तब्बल 12 तास एकाच जागेवर उभी असणाऱ्या मालगाडीत लाखो रुपयांची केळी होती. चालक नसल्यानं मालगाडीला निघण्यास विलंब झाल्यानं लाखो रुपयांच्या केळीचं नुकसान होण्याची शक्यता आहे. या नुकसानीस जबाबदार कोण? असा प्रश्नी केळी उत्पादक शेतकऱ्यांनी केला आहे.


 रेल्वे विभागाकडून केळी उत्पादक शेतकऱ्यांची थट्टा, शेतकऱ्यांचा आरोप
 
रेल्वेच्या गलथान कारभाराचा प्रत्येक केळी उत्पादक शेतकऱ्यांना आला आहे. केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम रेल्वे विभाग करत असल्याचा आरोप केळी उत्पादक शेतकरी करत आहेत. आधीच 14 तास उशिराने मिळालेली केळी वागन्स रात्री उशिरापर्यंत लोड करण्याचं काम केळी उत्पादक शेतकऱ्यांकडून चालू होतं. रात्री बारा वाजता ते पूर्ण होऊन एक तासात सावदा रेल्वे स्टेशन येथून गाडी निघायला हवी होती. परंतू तसं न होता सुमारे 12 तास सावदा रेल्वे स्टेशनवर ती गाडी तशीच उभी असल्यानं रेल्वे विभागाकडून केळी उत्पादक शेतकऱ्यांची घोर थट्टा सुरु आहे की काय असा प्रश्न निर्माण उपस्थित केला जात आहे. कालच रेल्वेच्या गलथान कारभाराचा आरोप सावदा फळबागायतदार युनियनने केला आहे. सकाळी रेल्वे वॅगन उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिल्यानंतर तब्बल 14 तासानंतर ते उपलब्ध करुन देण्यात आले होते. त्यामुळं दिवसभर कापलेली केळी सावदामाल धक्क्यावरच पडून होती. 


रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली उडवा उडवीची उत्तरे 


या गलथान कारभाराविषयी रेल्वेचे डीआरएम (Divisional Railway Manager) लक्ष द्यायला तयार नसल्याचा आरोपही केला जात आहे. रात्री भरलेली गाडी सकाळी बारा वाजेपर्यंत सावदा रेल्वे स्टेशनवर जशीच्या तशी उभी असल्यानं शेतकऱ्यांना यातून लाखो रुपयांचे नुकसान होणार असल्याचं केळी उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले आहे. दरम्यान, या भोंगळ कारभाराविषयी प्रसारमाध्यमांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला तेव्हा अधिकाऱ्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली आहेत. एक महाशय तर खूपच उर्मट भाषेत या  शेतकऱ्यांशी बोलत होते. त्यामुळं रेल्वेला कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न देणाऱ्या केळी उत्पादक शेतकऱ्यांवरच रेल्वेचे अधिकारी कोणता राग काढत आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे.


शेतकऱ्यांचे सुमारे 25 लाखाचे नुकसान होणार


रेल्वेकडून दिलेल्या वेळेत केळीची लोडिंग न झाल्यास रेल्वेकडून प्रति चार हजार रुपये विलंब शुल्क आकारण्यात येते. केव्हा केव्हा पाच ते दहा मिनिटांचेंदी विलंब फी आकारण्यात येते. मात्र, रेल्वेकडून उशीर झाल्यास शेतकऱ्यांना कोणतीही  मुभा मिळत नाही. केळीनं भरलेली रेल्वे गाडी 12 तास सावदा स्टेशनवर उभी होती. हे नाशिवंत फळ असल्याने ते जास्त वेळ टिकत नाही. या गाडीतील केळी ही खराब होणार हे निश्चित आहे. त्यामुळं दिल्लीतील व्यापारी कमी दरात  या केळीची मागणी करतील. त्यामुळं शेतकऱ्यांचे सुमारे 25 लाखाचे नुकसान होणार आहे. याला रेल्वे प्रशासनच जबाबदार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.


महत्त्वाच्या बातम्या: