Jalgaon: जळगावमध्ये रविवारी संध्याकाळी एक अंगाचा थरकाप उडविणारी घटना घडली, जळगावच्या एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. ज्यात 6 जण गंभीररित्या भाजले गेले, तर दोन जण किरकोळ जखमी आहेत. घटनेची माहिती मिळताच कासोदा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या जखमींवर कासोदा, जळगावात उपचार सुरू आहेत. (Gas Cylinder In Jalgaon)


 


नव्या सिलेंडरमधून गॅस गळती


एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे शेतकरी अनिल पुना मराठे हे गढी भागात आपल्या परिवारासह राहतात. रविवारी संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास त्यांनी गॅस सिलेंडर संपल्याने नवीन सिलेंडर आणला होता. नवा सिलेडर बसवल्यानंतर त्यातून गॅस गळती होत असल्याचे निदर्शनास आले. ज्यामुळे अचानक आग लागली. ही आग सुरूवातीला कमी प्रमाणात होती, घडलेल्या घटनेमुळे अनिल मराठे आणि त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य घराबाहेर पळाले. 


 


ग्रामस्थ घराच्या दरवाजा जवळ गेले असता...


या घटनेची माहिती मिळताच आजूबाजूचे ग्रामस्थ गोळा झाले, त्यांना वाटले की, शेतकऱ्याच्या कपाशीला आग लागली आहे. त्यामुळे ते घराच्या दरवाजा जवळ गेले असता अचानक घरातील गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट झाला. आणि या स्फोटामुळे यात ग्रामस्थ जोरात फेकले गेले. यात आठ जण भाजले गेले. घटनेची माहिती कळताच इतर ग्रामस्थांनी त्यांना जळगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील काही जखमींवर कासोदा तर काही जखमींवर जळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत...


हेही वाचा>>>


Uddhav Thackeray : इनकमिंग सुरु झालं पण उद्धव ठाकरेंनी अटी सांगितल्या, शिंदेंची साथ देणाऱ्या आमदारांना नो एंट्री, 'या' नेत्यांसाठी दारं खुली