जळगाव : नांदेड (Nanded) आणि संभाजीनगरला (Sambhajinagar) झालेले मृत्यू प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे झालेले असून मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) हे कितीही समर्थन करत असले तरी त्यांच्या काळात झालेले हे मृत्यू आपल्याला नाकारता येणार नाही. अशा पद्धतीने सरकारी रुग्णालये सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळत असतील तर गिरीश महाजन आणि आरोग्य खात्याचे मंत्री या दोघांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याचे आवश्यकता आहे, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे Eknath Khadse) यांनी केली आहे.
नांदेडच्या शासकीय रुग्णालयात (Nashik civil Hospital) 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी समोर आली अन् राज्यभरात खळबळ उडाली. त्यानंतर पुढच्या 24 तासात पुन्हा सात जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. या सर्व घटनेमुळे राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या घटनेवरून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. खडसे म्हणाले की, आरोग्य खातं आणि शासकीय महाविद्यालयामध्ये (Medical Collage) असलेले हॉस्पिटल्स हे आता अलीकडच्या कालखंडात मृत्यूच्या सापळे बनले आहेत. अशातच नांदेड आणि संभाजीनगरला एकाच दिवसांत झालेल्या मृत्यूची संख्या धक्कादायक आहे. हे मृत्यू प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे झालेले आहेत. मंत्री गिरीश महाजन हे कितीही समर्थन करत असले तरी त्यांच्या काळात झालेले हे मृत्यू आपल्याला नाकारता येणार नाही.
तसेच नाशिक (Nashik) विभागातील नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यामध्ये एप्रिलपासून तर जून पर्यंत 472 बालमृत्यू झाले आहेत. हे बालमृत्यू आदिवासी समाजामधील बहुतांश बालकांचे असल्याचे देखील समोर आले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील आतापर्यंतचा सहा महिन्यातील आकडा पाहिला तर तो जवळपास 700 हून अधिक असल्याचं समोर आला आहे. हा अधिकृत आकडा सरकारने तयार केलेला आहे. या राज्यामध्ये मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंटच्या माध्यमातून चालवलेली शासकीय महाविद्यालय अशा रीतीने जर आपल्या जीवाशी खेळत असतील तर याबाबत वैद्यकीय शिक्षण विभागाचे मंत्री गिरीश महाजन आणि आरोग्य खात्याचे मंत्री या दोघांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याचे आवश्यकता आहे असल्याचा गंभीर इशारा राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी दिला आहे.
केंद्र सरकारकडून मदत देणार
या प्रकरणावर भारती पवार यांनी संबंधित रुग्णालय प्रशासनाकडून अहवाल मागवला असून केंद्र सरकारच्या माध्यमातून आवश्यक ती मदत दिली जाईल, असे आश्वासन पवार यांनी दिले आहे. यावेळी त्या म्हणाल्या की, रोड ट्राफिक एक्सीडेंट असतात, इमर्जन्सी असते आणि पेशंट शिफ्ट करता करता पण त्या दुर्दैवी घटना घडतात. त्याचबरोबर काही पेशंट ऍडमिट असतात, काही ऑपरेशनसाठी असतात,ऑपरेशनच्या नंतरच्या काही कारणांमुळे घटना घडत असतात. अजून त्या बाबतीत खुलासा झालेला नाही. अनेकदा इमर्जन्सी पेंशट असतात, यात स्नेक बाईट किंवा ऍक्सीडेन्ट असतात यात पेशंटला दुर्दैवाने मृत्यू येतो. त्यामुळे याबाबतीत सविस्तर खुलासा मागवलेला आहे.
इतर महत्वाची बातमी :